आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी विजयाच्या काठावर; शिवसेनेला गटबाजी भोवली, काँग्रेसही दोलायमान, भाजपचे यश दुप्पट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - मिनीमंत्रालय अर्थातच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल गुरुवारी (दि. २३) जाहीर करण्यात आले. यामध्ये गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या सत्तेबाहेर असलेल्या राष्ट्रवादीने दमदार कमबॅक करत पुन्हा सत्तेला गवसणी घातल्याचे दिसत आहे. एकूण ५५ पैकी बहुमतासाठी २८ जागांची गरज आहे. राष्ट्रवादीला बहुमतासाठी जागांची गरज असून जिल्हा बँकेचा फाॅर्म्युुला जिल्हा परिषदेत राबविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक पंचायत समित्यांमध्येही राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्षीयांनी एकत्रित येऊन विविध संस्थांच्या सत्तेपासून राष्ट्रवादीला दूर ठेवले होते. गेल्या दोन टर्मपासून जिल्हा परिषदेत तर सेना काँग्रेस यांची युती होती. परंतु, यावेळी सर्वच पक्ष वेगवेगळे लढले आणि प्रत्येकांना आपल्या ताकदीची खरी जाणीव झाली. पुन्हा एकदा राष्ट्रवादीने जिल्हाभरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सक्रिय करून जिल्हा परिषदेतील आपले संख्याबळ वाढविण्यात यश मिळविले. जिल्हाभराचे लक्ष वेधून राहिलेल्या या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकून जिल्ह्यात क्रमांक एकवर पोचला आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस नंतर सेनेचा क्रमांक असला तरी भाजपनेही मागील निवडणुकीच्या तुलनेत ज्यादा जागा जिंकून आपली ताकद वाढत असल्याचे दाखविले आहे. या निवडणुकीत काँग्रेस सेना मात्र बॅकफूटवर गेली असून उस्मानाबाद तालुक्यात तर काँग्रेसला एकाही गटात विजय साकारता आलेला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीने काँग्रेसने उस्मानाबाद तालुक्यासह काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या तुळजापूर लोहारा, उमरगा तालुक्यातही आपली ताकद वाढवल्याने जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून तो समोर आला अाहे. दुसरीकडे सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसची बालेकिल्ला असलेल्या तुळजापूर तसेच उस्मानाबाद तालुक्यातही पीछेहाट झाल्याचे दिसत आहे. 

जिल्हा बँकेचा फाॅर्म्युुला 
उस्मानाबाद जि.प.च्या ५५ जागा आहेत. बहुमतासाठी २८ सदस्यांची गरज आहे. सर्वाधिक जागा राष्ट्रवादीकडे २६ असल्यातरी सत्ता स्थापनेसाठी सदस्यांची गरज आहे. दुसरीकडे मागील पॅटर्नप्रमाणे काँग्रेस-सेना-भाजप युती झाली तर २८ चा आकडा पूर्ण होऊ शकतो. मात्र जिल्हा बँकेत भाजप राष्ट्रवादीसोबत असून तोच फॉर्म्युला अवलंबला गेला तर राष्ट्रवादी सहज सत्ताधारी होऊ शकेल. त्यामुळे पडद्यामागच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
 
-राष्ट्रवादी काँग्रेस : बाजीराव पवार-गोवर्धनवाडी, विराट पाटील-पळसप, अर्चना शिंदे-जागजी, पद्मिनी भोसले-कोंड, सुरेखा कदम-तेर, सुषमा हाजगुडे-आळणी,संजय लोखंडे-येडशी, सुधीर करंजकर-कसबे तडवळे, मोहन साबळे-अंबेजवळगा, विद्या मगर-शिंगोली, अाशिष नायकल-सांजा, सुवर्णा इरकटे-समुद्रवाणी, प्रणिता क्षीरसागर-करजखेडा, बालाजी गावडे-बेंबळी, शोभा गोरे-रुईभर, श्याम जाधव-चिलवडी. 

-शिवसेना विजयी उमेदवार : गजेंद्र जाधव-वडगांव, संग्राम देशमुख-ढोकी, कुसुम इंगळे-चिखली, 
-काँग्रेस : चंद्रकला क्षीरसागर-इर्ला, आश्रुबा माळी-उपळा. 
-भाजप : प्रदीप शिंदे-वाघोली, कविता दळवे-पाडोळी, हेमा चांदणे-केशेगाव. 

उस्मानाबाद पंचायत समितीतील विजयी उमेदवार 
जिल्हा परिषदेसह पंचायत समितीमध्ये मिळालेल्या यशानंतर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी चौकात जल्लोष केला. 

पोलिसांची उपासमार 
दुपारी सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांना जेवणासाठी काही वेळाची सुटी देण्यात आली. यावेळी सकाळपासून बंदाेबस्तावर असलेल्या काही पोलिसही जेवण व्यवस्थेकडे जेवणासाठी गेले. यावेळी तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना जेवणापासून रोखून त्यांना प्रक्रिया पार पडल्यानंतरच जेवण असे सांगितल्याने पोलिसांची उपासमार झाल्याने नाराजी व्यक्त होत होती. 

चार तालुक्यातून काँग्रेसचा भोपळा : उस्मानाबाद,कळंब, भूम, परंड्यातील एकही काँग्रेसचा उमेदवार विजयी नाही. 
जिल्हा परिषदेतील यशाबरोबरच राष्ट्रवादीने पंचायत समितीमध्येही घवघवीत यश संपादित करत पैकी पंचायत समित्यांवर एकहाती वर्चस्व निर्माण केले आहे. यापूर्वी जिल्ह्यातील उस्मानाबाद, भूम वाशी या पंचायत समिती राष्ट्रवादीकडे होत्या. परंतु, यावेळी सेनेच्या ताब्यातील परंडा कळंब पंचायत समिती राष्ट्रवादीने स्वत:कडे खेचली असून वाशीत मात्र पैकी राष्ट्रवादी, सेना काँग्रेस यांना प्रत्येकी जागा मिळाल्याने त्रिशंकू स्थिती झाली आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, काँग्रेससह शिवसेनेला मतदारांकडून दणका...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...