आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढतींचा काँग्रेसचा मनसुबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राष्ट्रवादीकाँग्रेससोबत आघाडी झाली नसली तरी लढत मैत्रीपूर्ण करण्याचा मनसुबा काँग्रेसने रविवारी व्यक्त केला. दोन्ही पक्षांना मिळणाऱ्या धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजप- शिवसेनेला होऊ नये, अशी भूमिका असल्याचे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केली. दरम्यान, या भूमिकेचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसने केले उर्वरितपान 

असून,त्याबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. 
दोन्ही पक्षांनी जरी मैत्रीपूर्ण लढतीचा विचार केलेला असला तरी त्याचा सर्वात जास्त फायदा काँग्रेसलाच होणार आहे. काँग्रेसकडून सुमारे १०० उमेदवार, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुमारे ६० जागांवर उमेदवार निवडणुकीच्या िरंगणात असतील. येथे दोहोंमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल. याच सूत्राने राष्ट्रावादीने उमेदवार नसलेल्या प्रभागात काँग्रेसला पाठिंबा दिल्यास सुमारे ४० जागांवर काँग्रेसला लाभ होणार आहे. 

कॉँग्रेस भवनमध्ये रविवारी आमदार प्रणिती शिंदे यांना प्रचाराच्या पुढील रणनीतीविषयी विचारले असता त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, आमच्याविरोधात उमेदवार असल्यामुळे सर्वच विरोधक आहेत. मात्र, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नसली तरी आम्हा दोघांचे विचार एकच आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये यासाठी प्रचारादरम्यान मैत्रीचा प्रस्ताव ठेवू. अशा मैत्रीपूर्ण लढतीचा प्रयोग महाराष्ट्रात काही ठिकाणी झाला आहे, इथेही पाहू. 

मैत्रीपूर्ण लढतीचे स्वागत 
आघाडीतुटली तरी कॉँग्रेस राष्ट्रवादीचे विचार एकच आहेत. आमचे उमेदवार जरी एकमेकांसमोर उभे असले तरी मैत्रीपूर्ण लढत शक्य आहे. आमचा प्रमुख विरोधक जातीयवादी पक्ष आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार नसलेल्या प्रभागात काँग्रेसला पाठिंबा देण्याचा विचार होऊ शकतो. तसा प्रस्ताव काँग्रेसकडून आल्यास वरिष्ठांशी बोलून निर्णय घेता येईल.”
- भारतजाधव, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

पक्षाबाहेर गेले तेच बरे झाले 
पक्षानेमोठे केले, त्यांचे करिअर घडवले. त्यांना पदे दिली. त्यांना फक्त प्रभाग बदलून निवडणूक लढण्यासाठी सांगितले होते. स्वीकृत सदस्य पदही द्यायचे सांगितले होते. मात्र त्यांनी काहीच स्वीकारले नाही. उलट पक्षाबाहेर गेले. असे लोक पक्षात राहून धोका देण्यापेक्षा बाहेर गेलेलेच बरे झाले, असा टोला आमदार प्रणिती शिंदे यांनी लगावला. 
बातम्या आणखी आहेत...