आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय प्रवेश परीक्षेत चालणार नाही बांगड्या, बूट, नथ आणि बरेच काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी होत आहे. परीक्षेसाठी ड्रेसकोड लागू केला आहे. अर्जाच्या माहितीपत्रकात याची नियमावली दिली आहे. परीक्षार्थींना बूट, घड्याळ, अंगठी, बांगड्या, पैंजण घालण्यास मनाई केली आहे. अर्ध्या बाह्यांचे शर्ट घालावे लागणार आहेत. अन्यथा परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही.

परीक्षा हाॅलमध्ये वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी उपस्थित राहवे लागेल. फूल शर्ट, कमीज, बूट वापरता येणार नाही. साधी चप्पल वापरावी लागेल. चष्मा असेल तर नेत्रतज्ज्ञांकडून किंवा पर्यवेक्षकांकडून तो तपासण्यात येईल. मनगटी दोरा, गळ्यात चेन, लॉकेट, धार्मिक प्रतीके, दोरा, टोपी, रूमाल वापरता येणार नाही. तसेच मुलींसाठीही कर्णफुले, नथ, पर्स, बॅग उंच टाचेचे सँण्डल, केसांना मोठ्या पिन, मोठे बटण, ओढणी, पेन, पेन्सिल, कंपास, मोबाइल, पाणी बाटली आदी काहीही जवळ बाळगता येणार नाही. 

केंद्रीय परीक्षा बोर्डाप्रमाणेच परीक्षा केंद्रावर घड्याळ असेल. प्रत्येक केंद्रावर सीबीएससीचे एक निरीक्षक राहतील. हॉलतिकिटावरील निर्धारित वेळेतच विद्यार्थ्यांनी केंद्रात उपस्थित राहवे. नियमांचे काटेकोर पालन अपेक्षित आहे. बदलत्या आव्हानांना विद्यार्थी, पालक, समाज, शिक्षक आणि यंत्रणेने स्मार्टपणे, संयमाने सामोरे जावे. यासाठी केेंद्राने केलेल्या नियमांचा आदर करून शांतपणे, ताण घेता परीक्षा द्यावी.
- धनंजय शहा, प्राध्यापक, वालचंद महाविद्यालय 
बातम्या आणखी आहेत...