आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर : रामवाडीच्या बाजूने उभारतेय रेल्वेचे नवे बुकिंग काउंटर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वे प्रशासनाने मालधक्क्याच्या मागील जागेत चालू तिकीट विक्रीसाठी कक्ष बांधण्याचे काम सुरू केले आहे. - Divya Marathi
रेल्वे प्रशासनाने मालधक्क्याच्या मागील जागेत चालू तिकीट विक्रीसाठी कक्ष बांधण्याचे काम सुरू केले आहे.
सोलापूर - दमाणी नगर,रामवाडी, सलगर वस्ती, देगाव परिसरात राहणाऱ्यांना नागरिकांना आता रेल्वेचे सर्वसाधारण तिकीट काढण्यासाठी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील तिकीट खिडक्यांवर येण्याची गरज भासणार आहे. कारण रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठी जम्बो मालधक्यांच्या पाठीमागच्या बाजूस चालू तिकीट खिडकी सुरू करत आहे. 
 
तिकीट खिडकीचे काम सुरू झाले असून, येत्या एक ते दोन महिन्यांत तिकीट खिडकीवरून प्रवाशांना तिकिटे मिळण्यास सुरुवात होईल. यामुळे रेल्वे स्थानकाच्या पाठीमागच्या बाजूस राहणाऱ्या नागरिकांना तिकिटे काढण्यासाठी भय्या चौकाला फेरी मारून जाण्याची गरज भासणार नाही. परिणामी प्रवाशांचा वेळ वाचेल. तसेच स्थानकावरील तिकीट खिडक्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. 
 
मालधक्क्याच्या पाठीमागच्या बाजूस अभियांत्रिकी विभागाचे प्रशिक्षण केंद्र आहे. याच्या बाजूलाच तिकीट काउंटर सुरू केले जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकासमोरील गर्दीचे विभाजन व्हावे या करिता दैनिक दिव्य मराठीने चार वर्षांपूर्वी हा पर्याय रेल्वे प्रशासनासमोर मांडला होता. त्यावेळी तत्कालीन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी या पर्यायाला अनुकूलता दर्शवत तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसमोर हा प्रस्ताव मांडला होता. त्याचे काम आता सुरू होत आहे. नूतन काउंटरवर सुरुवातीच्या काळात दोन खिडक्यातून तिकीट विक्री होईल. तसेच ज्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी अधिक असते. अशा गाड्यांच्या वेळेत या तिकीट खिडकीतून विक्री होईल. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन तिकीट विक्रीची वेळ खिडक्यांची संख्या वाढवली जाणार आहे. याचे बांधकाम सुरू असून, येत्या एक ते दोन महिन्यात काम पूर्णत्वास येईल. 
 
या खिडकीतून चालू तिकीट मिळेल 
- रामवाडी मालधक्क्याच्या पाठीमागे चालू तिकीट खिडक्यांचे काउंटर सुरू करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. लवकरच हे प्रवाशांच्या सेवेत येईल. यामुळे स्थानकावरील तिकीट केंद्रावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. शिवाय प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
” राजेन्द्र कुमार शर्मा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक , सोलापूर 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, ‘दिव्य मराठी’ने मांडला होता विषय...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...