आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: वारंवार अपघात, पण अधिकाऱ्यांचे लक्ष 300 शाही डब्यांकडेच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर- नुकत्याच तीन माेठ्या रेल्वे दुर्घटना घडल्या अाहेत. एकीकडे सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासाच्या मूलभूत सुविधादेखील मिळत नसल्याची स्थिती अाहे, तर दुसरीकडे रेल्वे विभागाील अधिकारी व्हीअायपी सुविधांचा अानंद घेत अाहेत. रेल्वेत ब्रिटिश काळापासून सुरू असलेली व्हीअायपी संस्कृती अाजही सुरू अाहे. वरिष्ठ अधिकारी अजूनही सलून कारचा (शाही डबे) वापर करत अाहेत. २०१५-२०१६ मध्ये या सलून कारवर २६० कोटी रुपये खर्च झाले अाहेत, तर २०१६-२०१७ मध्ये हा खर्च २८२ काेटींवर गेला अाहे. रेल्वेकडे एकूण ३१४ सलून कार अाहेत. त्यापैकी ३०० कारचा वापर केला जाताे. 

रेल्वेतील अधिकारीवर्ग लाेकल निरीक्षण वा रेल्वे रुळांचे निरीक्षण करण्याच्या नावावर सलून कारमधून प्रवास करतात. मागील वर्षी उत्तर रेल्वे विभागात वाराणसीतील काशीविश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी वर्षभरात १७६ वेळा अधिकाऱ्यांकडून या सलून कारचा वापर झाला. केवळ अधिकारीच या डब्यांचा वापर करतात असे नाही, तर रेल्वेमंत्रीदेखील यात मागे नाहीत. लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात दिल्ली ते पाटणादरम्यान ३६९ वेळा या डब्यांचा वापर झाला. ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात मात्र कमी वापर झाला. सलून कारची सुविधा रेल्वेत १९२७ पासून सुरू अाहे, असे रेल्वे बाेर्डाच्या नवी दिल्ली प्रवासी सेवा समितीचे सदस्य डाॅ. अशाेक त्रिपाठी यांनी सांगितले. डीअारएम, जीएम किंवा बाेर्डाच्या सदस्यांसाठी या सलून कार अारक्षित असतात. एसएजी दर्जाच्या अधिकाऱ्याला मात्र परवानगी घ्यावी लागते. या सलून कारचे खरे नाव निरीक्षण कार असे अाहे; परंतु ९० टक्के सलून कारचा वापर अधिकारी कुटुंबासह प्रवास करण्यासाठी करतात. ब्रिटिशांच्या काळात अधिकारी स्वत:ला भारतीयांपेक्षा वेगळे दाखवण्यासाठी याच सलून कारचा वापर करत असत.

हे डबे पूर्णपणे वातानुकूलित असतात. त्यात दाेन बेडरूम, डायनिंग रूम, स्वयंपाकगृह, शाैचालय व एक गॅलरी असते. साेबतच टीव्ही, फ्रीज यांसारख्या सुविधाही असतात. याशिवाय अधिकाऱ्यांच्या दिमतीला चार कर्मचारी व मांसाहार भाेजन बनवण्यासाठी दाेन स्वयंपाकीदेखील असतात. सहायकासाठी वेगळी जागा असते. ते सांगतात की, सलून कारचा वापर करून नवीन रेल्वेगाड्या बनवल्या जाऊ शकतात. असे केले गेले तर १५ विशेष रेल्वे बनतील. रेल्वेतील हे ब्रिटिशराज लवकर बंद व्हायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. याबाबत रेल्वेमंत्र्यांना या वर्षी निवेदन देण्यात अाले अाहे. तथापि, या कारचा वापर तपासणी, परीक्षण या कामांसाठी हाेताे. ही व्हीअायपी संस्कृती नाही. असे असले तरी सलून कार बंद करण्याबाबत अद्याप काेणताही निर्णय झालेला नाही, असे रेल्वे बाेर्डाचे नवी दिल्ली येथील जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार सक्सेना यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...