आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिपॉझिट, भाड्यासाठी पालिकेचा कारवाईचा बडगा; २० गाळे सील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- आरक्षण क्रमांक ७१ मध्ये पालिकेचे ५४ गाळे असून यापैकी ४६ गाळेधारकांनी लिलाव होऊन अनेक वर्षे उलटून गेली तरी डिपॉझिट भाड्याची रक्कम भरली नाही. यामुळे २० गाळेधारकांवर कारवाई करून टाळे ठोकण्यात आले आहे. पालिकेच्या वसुली विभागाने मंगळवारी (दि.१२) ही केली. उर्वरित २६ गाळेधारकांवर बुधवारी (दि.१३) कारवाई करण्यात येणार आहे. दोन दिवसांत डिपॉझिट भाड्याची रक्कम भरल्यास पालिका पुन्हा गाळ्यांचा लिलाव करणार असल्यामुळेे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहरातील आठवडी बाजार परिसरात म्हणजेच आरक्षण क्रमांक ७१ मध्ये पालिकेचे ५४ गाळे आहेत. या गाळ्यांचा लिलाव २०१०-११ मध्ये करण्यात आला हाेता. लिलावानंतर निश्चित करण्यात अलेली डिपॉझिटची रक्कम गाळेधारकांनी तत्काळ भरण्याची गरज आहे. तसेच करारनामा करण्याची गरज आहे. मात्र, ४६ गाळेधारकांनी अनेक वर्षे होऊनही करारनामा केला नाही. गाळेधारकांकडून पालिकेला एकूण कोटी ७४ लाख घेणे आहे. पालिकेला महसूल मिळत नसल्यामुळे डिपॉझिट भाड्याच्या रकमेसाठी नोटीस बजावत होती. मात्र, गाळेधारक दुर्लक्ष करत होते. मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्या हे निदर्शनास आल्यानंतर गाळेधारकांना प्रथम नोटीस बजावण्यात आली. गाळेधारकांनी नोटिसीकडे दुर्लक्ष केले. मुख्याधिकारी रोडे यांनी वसुली विभागाला कारवाईचे आदेश दिले. मंगळवारी वसुली अधिकारी बी. एस. मोरे, सुनील कांबळे, संभाजीराजे निंबाळकर, विलास गोरे, बाळासाहेब खरात, संतोष गायकवाड, रवींद्र मोरे, शिवाजी वाघमोडे, दिलीप डाेंबे, शैलेश पाटील, मजीद शेख, राजाभाऊ शेरकर, नानासाहेब पवार, सूर्यकांत शेरकर, सलीम शेख यांच्यासह बारा सदस्यांच्या पथकाने कारवाई करून सील ठोकले आहे. पाच वर्षांनंतर झालेल्या कारवाईमुळे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी रक्कम भरण्यास सहमती दर्शवली आहे. काहींनी धनादेशाच्या स्वरूपात रक्कम जमा करण्यासाठी पुढे आले आहेत.

मुदत देण्यात यावी
गाळ्यांचेडिपॉझिटभाड्याची रक्कम भरण्यासाठी गाळेधारक तयार आहेत. रक्कम भरण्यासाठी मुदत देण्याची गरज आहे. बहुतांश गाळेधारकांनी काही प्रमाणात डिपॉझिट भाडे जमा केले आहे. शिल्लक रक्कम भरण्यासाठी पालिकेने मुदत द्यावी. - सलीम काझी, गाळेधारकव्यापारी.

नोटीसचे पालन करा
गाळेधारकांनीडिपॉझिटभाड्याची रक्कम जमा करता नोटिसीकडे दुर्लक्ष केल्यामुळे २० गाळ्याना टाळे ठोकले. उर्वरित २६ गाळेधारकांवर कारवाई होणार आहे. टाळे ठोकलेले गाळे उघडल्यास फौजदारी कारवाई होणार, भाडे वसुलीसाठी बोजा चढवणार. - प्रशांत रोडे, मुख्याधिकारी,नगरपालिका

भाडे वसुलीसाठी गाळेधारकांवर बोजा
लिलावानंतर गाळे ताब्यात घेऊन गाळेधारकांनी वापर केला आहे. मात्र, अनेक वर्षे उलटून गेली तरी डिपॉझिट भाडे जमा केले नाही, अशा गाळेधारकांकडून भाडे वसूल करण्यासाठी फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवण्यात येणार आहे.

गाळे उघडल्यास होणार फौजदारी
महसूल वाढवण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली अाहे. त्याप्रमाणे मंगळवारी २० गाळेधारकांवर कारवाई करून गाळे सील केले आहेत. संबंधीतांनी गाळे उघडल्यास पालिका फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे, यामुळे गाळेधारकांची धांदल उडाली असून कारवाईपासून वाचण्यासाठी तारेवरची कसरत सुरू आहे.

तत्काळ होणार पुन्हा लिलाव
अनेक वर्षे होऊनही ४६ गाळेधारकांनी डिपॉझिट भाड्याची रक्कम भरली नाही. कारवाई करण्यात आलेल्या गाळेधारकांनी दोन दिवसांत रक्कम भरल्यास पालिका तत्काळ पुन्हा गाळ्यांचा लिलाव करून महसूल गोळा केला जाणार आहे. याबाबत गाळेधारकांचे कोणतेही कारण ऐकले जाणार नाही.