आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीदार झालेले प्रत्येक गाव विजयीच : अामिर खान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पाणीफाउंडेशनची वॉटर कप स्पर्धा ही महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आहे. आपण सर्वजण पहाटे श्रमदान करून कामावर जाता आणि कामावरून येऊन पुन्हा रात्री श्रमदान करता. आपण एकत्र येऊन श्रमदानाद्वारे गाव पाणीदार करण्यासाठी जे प्रयत्न करीत आहात ते आमच्यासाठी कौतुकास्पद आहे.

राज्यातील प्रथम आलेल्या गावाला बक्षीस दिले जाणार असले तरी या स्पर्धेनंतर जे गाव पाणीदार होईल, ते प्रत्येक गाव विजयी असेल, असा विश्वास अभिनेते आमिर खान यांनी बुधवारी व्यक्त केला. उत्तर साेलापूर तालुक्यातील राळेरास गावी ‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने सुरू असलेल्या कामांना अामिर त्याची पत्नी किरण रावने भेट दिली तसेच या कामास हातभारही लावला. 
बातम्या आणखी आहेत...