आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत राज समिती येणार जून महिन्यामध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्हापरिषदेत मे महिन्यात येणाऱ्या पंचायती राज समितीचा (पीअारसी) दाैरा जूनमध्ये अायाेजित केला अाहे. समिती ते जून या कालावधीत दाैरा करणार अाहे. पूर्वी हा दाैरा फेब्रुवारी नंतर मे महिन्यात हाेणार हाेता. 
 
कधी अंतर्गत राजकराणामुळे तर कधी प्रशासन सत्ताधारी यांच्यात याेग्य समन्वय नसल्याचे जिल्हा परिषदेत निधी अखर्चित राहताे. सत्ताधारी विराेधक एकमेकांवर कुरघाेडीची एकाही संधी साेडत नाहीत. सर्वसाधारण, स्थायी समिती सभांमध्ये एकही विषय विषयसूचीवर नसताे. १० ते १२ विषय वेळेवर मांडण्यात येतात. यावरून अनेक सभांमध्ये विराेधक अाक्रमक हाेतात. 
सत्ताधारी विराेधक अामने-सामने येतात. परिणाम सभागृहात प्रचंड गदाराेळ हाेताे. याचा परिणाम विकासावर हाेत अाहे. अशातच अनेक याेजनांमध्ये अनियमितता झाल्याचा अाराेपही विराेधकांमधून हाेताे. त्यामुळे पीअारसीच्या दाैऱ्याची विराेधक सत्ताधारी भारिप-बमसंमधील काही सदस्य अातुरतेने वाट पाहत हाेते. अाता हा दाैरा निश्चित झाला अाहे. 

..तरसत्ताधारी सदस्यच करणार अांदाेलन: अधिकाऱ्यांच्याबेताल कारभारामुळे काेट्यवधी रुपयांचा निधी अखर्चित राहिला हाेता. निधी अखर्चित राहिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भारिप-बमसं सदस्य गाेपाल काेल्हे यांनी १२ एप्रिल राेजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत केली हाेती. अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास पंचायती राज समितीच्या (पीअारसी) दाैऱ्यात जिल्हा परिषदेमध्येच मंडप टाकून अांदाेलन करण्यात येईल, असा इशारा काेल्हे यांनी दिला हाेता. अाता ते अांदाेलन करतात कि पक्ष नेतृत्व त्यांची समजूत काढतात, हे दाैऱ्यात स्प‌ष्ट हाेईल. 
 
तिसऱ्यांचा झाले नियाेजन
पंचायती राज समितीच्या दाैऱ्याचे तिसऱ्यांदा नियाेजन झाले अाहे. प्रथम हा दाैरा फेब्रुवारीत अायाेजित केला हाेता. त्यानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरु झाले. सर्व विभागांची माहिती, राबवलेल्या याेजनांची माहिती, लेखा अभिलेख संकलित केले. त्यानुसार पुस्तिका तयार केली. यासाठी खर्च वेळही गेला. मात्र, हा दाैरा पुढे ढकलला. त्यानुसार ३, मे यादरम्यान दाैऱ्याचे नियाेजन केले. मात्र, त्यानंतर पुन्हा हा दाैरा रद्द केला. 
बातम्या आणखी आहेत...