आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीत दर्शनबारीव्यतिरिक्त अन्य दरवाजाने प्रवेशास मनाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पंढरपूर येथे ७ फेब्रुवारी रोजी माघी यात्रा आहे. यात्रेनिमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्या लक्षात घेता विठ्ठल-रुक्मिणी मंदिराभोवती असलेल्या कोणत्याही इमारतीच्या दरवाजाने मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली अाहे, असे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी अजित रेळेकर यांनी जारी केले आहेत.   पंढरपुरात माघी यात्रेनिमित्त लाखो भाविक वारकरी दर्शनासाठी येत असतात. २ ते १० फेब्रुवारीदरम्यान माघी यात्रेच्या कालावधीत शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीही आदेश जारी करण्यात आले आहेत.
   
या आदेशानुसार विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सार्वजनिक पूजा व इतर धार्मिक विधीच्या वेळा सोडून दर्शनासाठी खुले राहणार आहे. मंदिर समितीने फक्त दर्शनबारीतूनच भाविकांना दर्शनासाठी सोडले जाईल, अन्य कोणत्याही दरवाजातून सोडण्यात येणार नाही. उत्तर दरवाजातून व्हीआयपी गेटवरून फक्त व्हीव्हीआयपी, व्हीआयपी आणि पासप्राप्त व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. ज्यांना मुखदर्शनाच्या बारीतून दर्शन घ्यावयाचे आहे, त्यांनी उत्तर  दरवाजातूनच बाहेर पडावे. पश्चिम दरवाजासमोरील मोकळ्या जागेत गर्दी होणार नाही याचीही दक्षता भाविकांनी घ्यावी. मंदिराच्या सोळखांबीजवळील उत्तरेकडील दरवाजानेही भाविकांना येण्या-जाण्यास मनाई करण्यात आली आहे. दर्शनबारीनुसार भाविकांना दर्शन मिळावे यासाठी नियोजन करून मंदिराच्या आतील सर्व दरवाजे बंद ठेवण्यात यावेत. हे दरवाजे आपत्कालीनप्रसंगी व प्रशासकीय कामाच्या आवश्यकतेनुसार उघडण्यात येतील.  
 
 
बातम्या आणखी आहेत...