आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'..तर विठ्ठलाची पूजा नाही', चांदाेबाचा लिंब येथे रंगले पहिले उभे रिंगण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे पहिले उभे िरंगण बुधवारी तरडगावजवळील चांदाेबाचा लिंब (जि. सातारा) येथे दुपारी माेठ्या उत्साहात पार पडले. - Divya Marathi
संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे पहिले उभे िरंगण बुधवारी तरडगावजवळील चांदाेबाचा लिंब (जि. सातारा) येथे दुपारी माेठ्या उत्साहात पार पडले.
पंढरपूर - ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून पुरुषसूक्त काढून टाकल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. तसेच अाषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी मंदिरात जाऊ देणार नाही,’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

‘बडवे हटाव चळवळीच्या विजयानंतर विठ्ठल-रखुमाई मंदिरे बडव्यांच्या आणि उत्पातांच्या कचाट्यातून मुक्त झाली. विठ्ठल-रखुमाई स्वत:देखील या मंडळींच्या जाचातून मुक्त झाले आहेत. हा संघर्ष सुमारे पन्नास वर्षे चालल्यानंतर यशस्वी झाला. त्यामुळे यापाठोपाठ दुसरा संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्णय विठ्ठल- रखुमाई मुक्ती आंदोलन आणि श्रमिक मुक्ती दलाने हाती घेतला.
विठुमाउली आणि संतपरंपरा व वारकरी परंपरा यांना अवमानकारक असणारे पुरुषसूक्त हे विठुमाउलीच्या पूजा विधीच्या प्रक्रियेतून काढून टाकण्याची मागणी पूर्वीपासूनच अाम्ही केली होती. आघाडी सरकारने मात्र यासंदर्भात कोणतीही कृती केली नाही. अाता युती सरकारनेही या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही आमचा संघर्ष चालू ठेवण्याचा आणि तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरुषसूक्ताची हकालपट्टी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही,’ असा निर्धारही पाटणकर यांनी बाेलून दाखवला. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात कृती करण्याचा निर्णय घेतल्याशिवाय त्यांना पूजेला जाऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
चांदाेबाचा लिंब येथे रंगले माउलींच्या पालखीचे रिंगण
संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे पहिले उभे िरंगण बुधवारी तरडगावजवळील चांदाेबाचा लिंब (जि. सातारा) येथे दुपारी माेठ्या उत्साहात पार पडले. पालखीची प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या मानाच्या अश्वाचे दर्शन घेण्यासाठी, त्याच्या पावलाखालच्या मातीचा अंगारा माथी लावण्यासाठी भाविक व वारकऱ्यांची झुंबड उडाली हाेती. सातारा जिल्ह्यात माउलींच्या पालखीचे दोन मुक्काम आहेत. बुधवारी तरडगावला, तर गुरुवारी फलटणला मुक्काम असेल.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...