आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर अर्बन बँकेवरील छाप्याचा अहवाल तीन महिन्यांनंतरही नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नोटबंदीच्या काळात पंढरपूर अर्बन बँकेची अायकर विभागाकडून तपासणी झाली होती. त्याची कागदपत्रे तपासणी अहवाल सादर करण्याचे काम सुरू अाहे, अशी माहिती पुणे विभागाचे मुख्य अायकर अायुक्त सत्यकाम मिश्रा यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. 
 
मागील वर्षी मुख्य कार्यालयावरील २५ नोव्हेंबरच्या छाप्यात अधिकाऱ्यांनी २४ तासांहून अधिक काळ बँकेचे लॉकर्स, जनधन खात्यामध्ये जमा झालेली रक्कम, नोव्हेंबरनंतर जमा झालेल्या नोटा आदींची तपासणी मोजदाद केली. ग्राहकास दिले नसलेल्या काही लॉकर्समध्ये मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा आढळून आल्याचे िवभागातील सूत्रांनी सांगितले होते. बँकेत जमा झालेल्या १०० कोटी रुपयांच्या रकमेची मोजदाद करण्यात अाली होती. त्याच्या तीन महिन्यानंतरही आयकर विभाग अजून अहवाल तयार करण्यातच आहे. यासह अन्य बँकांवरील छाप्याविषयी विचारले असता अहवाल तयार करत असल्याचे सांगितले. 

श्री. मिश्रा यांनी अघोषित संपतीची जाहीर करणयाच्या योजनेची माहिती या वेळी दिली. ही ३१ मार्चपर्यंत संपत्ती जाहीर केल्यास रकमेच्या ५० टक्के (४९-५ टक्के) रक्कम करामध्ये जमा होईल. उर्वरित ५० टक्के रकमपैकी २५ टक्के रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत जमा होतील. ते पैसे चार वर्षांनी अापल्या खात्यात परत जमा होतील. त्यावर व्याज मिळणार नाही. उरलेले २५ टक्के अापली संपत्ती राहील. एप्रिलपासून मोठ्या दंडात्मक म्हणजे ७७ टक्के अायकर भरावे लागेल. २०० टक्के अतिरिक्त दंड भरावे लागेल अशा मोठ्या कारवाईस सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. 

बेहिशेबी संपत्ती असल्याचे निष्पन्न झाल्यास २०० टक्के दंड, १० टक्के वाढीव दंड ७७ टक्के कर एवढी मोठी दंडात्मक कारवाईला अापणास सामोरे जावे लागणार असल्याचे श्री. मिश्रा यांनी सांगितले. 

{मागील वर्षात ३६ हजार कोटींचा अायकर जमा 
{काळा पैसा बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना सुरू अाहेत 
{अायकर विभाग कोणाचीही चौकशी करू शकते 
बातम्या आणखी आहेत...