आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलिसच येणार अाता अापल्या घरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पासपोर्टसाठी अापण अर्ज केल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याकडून व्हेरिफिकेशन होते. त्यासाठी पोलिस ठाण्यात अापणाला चकरा माराव्या लागत होत्या. या चकरा अाता माराव्या लागणार नाहीत. व्हेरिफिकेशनसाठी पोलिस थेट अाता अापल्या घरी येणार अाहेत. हा उपक्रम फक्त ग्रामीण पोलिस राबवत अाहेत. याचा प्रारंभ सोमवारी सकाळी होणार होईल. 
 
पासपोर्टसाठी अाॅनलाइन अर्ज भरल्यानंतर पासपोर्ट विभागात अापल्या संपूर्ण माहितीची पडताळणी होते. त्यानंतर अापण जो पत्ता त्याचा पुरावा दिला अाहे, त्यानुसार पासपोर्ट कार्यालयाकडून संबंधित पोलिस ठाण्यात अाॅनलाइन अर्ज जाईल. त्यानंतर पोलिस थेट अापल्या गावी घरी येतील. अापण दिलेली माहिती. चारित्र्य पडताळणी याशिवाय अन्य बाबींची खातरजमा करतील. परिपूर्ण माहिती भरल्यानंतर पोलिस ती फाइल अाॅनलाइनच दाखल करतील. जिल्हा विशेष शाखेतील अधिकारी याची खातरमजा करतील. माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर ती पुन्हा पासपोर्ट विभागाकडे जाईल. जिल्ह्यातील २३ पोलिस ठाण्यात पोलिसांना खास टॅब देण्यात अाले अाहेत. अाॅनलाइन अर्ज अाल्यानंतर पोलिस थेट अापल्या घरी येतील. माहिती घेतील. त्यावर अर्जदार संबंधित पोलिसाची डिजिटल स्वाक्षरी राहील. त्यानंतर जिल्हा विशेष शाखेकडून हा अाॅनलाइन अर्ज पासपोर्ट विभागात जाईल. यात नागरिकांचा त्रास, वेळ पैसा वाचेल. याचा शुभारंभ सोमवारी होत असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण भोसले यांनी दिली. 
 
पोसपोर्ट पोलिस अॅपचा अाज प्रारंभ 
पासपोर्ट पोलिस अॅपचा प्रारंभ सोमवारी सकाळी दहाला ग्रामीण पोलिस मुख्यालयात होणार अाहे. विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे अनिलकुमार सिंग यांच्या हस्ते तर पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. 
बातम्या आणखी आहेत...