आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूरवाडीत झाली ओळख अन्, पिस्तूल घेण्यापर्यंत गेली मजल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कुरूल येथे राहणारा अाैदुंबर माने आणि उमरगा येथे राहणारा प्रवीण स्वामी हे दोघे चांगले मित्र. मानेची सासुरवाडी उमरग्यात असल्यामुळे तो नेहमी तिकडे जायचा. अोळखीतून दोघांची जवळीकता वाढली. स्वामीच्या अोळखीने भीमाशंकर तळवार (रा. खजुरी, अाळंद) याची अोळख झाली. मानेला पिस्तूल घेण्याचा मोह अावरला नाही अन् मागील शनिवारी तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देगावजवळ जेरबंद केले. तीन दिवसांच्या तपासात ही माहिती समोर अाल्याचे फौजदार चावडीचे फौजदार शैलेश खेडकर यांनी बुधवारी दिली. गुरुवारी तिघांची पोलिस कोठडी संपणार अाहे. 
 
माने हा शेतकरी आहे. कुरूल येथे त्याची शेती अाहे. स्वामी हा उमरग्यात लागेल त्या ठिकाणी कामाला जातो. माने अधून-मधून उमरग्याला ये-जा करीत असल्यामुळे अोळख होती. मानेला पिस्तुल पाहिजे होते. ही बाब स्वामीला त्याने बोलून दाखवली. तळवार हा कर्नाटकातून पिस्तुल अाणून विकत असल्याची माहिती मिळाल्यामुळे दोघे त्याच्या संपर्कात अाले. पन्नास हजारांत माने पिस्तुल घेणार होता. देगाव रोडवर हा व्यवहार होणार होता. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित माने यांना ही माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून तिघांना शनिवारी जेरबंद केले. 

माने स्वामी यांचे क्रिमिनल रेकाॅर्ड नाही. पण हौस म्हणून पिस्तुल घेणार होते. तळवार याने कर्नाटकातून कोणाकडून पिस्तुल अाणले याची चौकशी सुरू अाहे. अद्याप त्याने माहिती दिली नाही, असे सांगण्यात आले. तळवारकडून दोन गावठी रिव्हाॅल्व्हर चार काडतुसे जप्त करण्यात अाली अाहेत. 

एप्रिल महिन्यात सिद्धेश्वर पेठेत अायपीएल सट्टा लावताना चौघांना जेरबंद केले. जेल रोड पोलिसांकडे तपास दिला. मागील महिन्यात देगाव टोल नाक्याजवळ चंदनाचे अोंडके पडले. त्याचा तपास सलगरवस्ती पोलिसांना दिला. आता पिस्तुल पकडले, फौजदार चावडी पोलिसांकडे तपास दिला. मुद्दा हा अाहे की, पोलिस ठाण्याच्या व्यापातून घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास होत नाही. अायपीएल सट्टा कुणाकडून घेत होते हे समोर अाले नाही. चंदनाची झाडे कुठून अाणली कुठे विकली जाणार होती, याचा शोध लागला नाही. अाता पिस्तुल मूळ कोणाकडून अाणले याचा शोध लागेल का? हा मुद्दा अाहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील म्हणतात, चंदन कामतीतून घेऊन हैदराबादकडे विकण्यासाठी नेत होते. अटकेत असलेलेच सूत्रधार अाहेत. सहायक निरीक्षक रणजित माने म्हणतात, पिस्तुल पकडले. पण तपास फौजदार चावडीला दिलाय. अन्य गुन्ह्यांचा शोध अाम्ही करीत अाहोत. गुन्हे शाखेतही उपायुक्त, सहायक अायुक्त, निरीक्षक, सहायक निरीक्षक फौजदारासह १०० च्या अासपास ताफा अाहे. महत्त्वाच्या घटनांचा तपास मुळापर्यंत जाऊन करणे गरजेचे अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...