आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनविभाग करणार वृक्षलागवड, 'सैराट'मधील सेलेब्स होऊ शकतात सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत एक जुलैला जिल्ह्यात लावण्यात येणाऱ्या सहा लाख ३८ हजार झाडांपैकी तब्बल साडेपाच लाख झाडे वनविभागातर्फे २९ ठिकाणी लावण्यात येणार आहेत. ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटातील झेंडू अर्थात बालकलाकार सायली भंडारकवठेकरसह त्या चित्रपटातील इतर कलाकार वृक्षलागवड मोहिमेत सक्रिय सहभागी होणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक सुभाष बडवे यांनी दिली. ‘हास्यसम्राट’ प्रा. दीपक देशपांडे हे सिद्धेश्वर वनविहार येथील वृक्षलागड करणार आहेत. त्याबाबतच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी वनविभागातर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती.

श्री. बडवे म्हणाले, “चित्रपट, दूरचित्रवाणी, सामाजिक क्षेत्रातील सेलिब्रिटींना सोबत घेऊन मोहीम यशस्वी करणार आहोत. सोमवारी सोलापूर शहर, पंढरपूर माळशिरस तालुक्यात जनजागृती दिंडी काढण्यात येणार आहेत. वनविभाग सामाजिक वनीकरणसह इतर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये या मोहिमेत सहभागी होत आहे. संबंधित तालुक्यात तेथील लोकप्रतिनिधींसह, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. मोहिमेत सहभागींनी लावलेल्या झाडाच्या समवेत काढलेला सेल्फी फोटो वनविभागाच्या वेबसाइटवर अपलोड करावा. राज्यभरातून लकी ड्रॉ पद्धतीने फोटोंची निवड होणार असून विजेत्यांना वन पर्यंटनाची संधी आहे. यात अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.”

या पत्रकार परिषदेला सहाय्यक वनअधिकारी विनय परळकर, वनपरिक्षेत्र अधिकारी एन. डी. जाधव, राजेंद्र कुलकर्णी, अधीक्षक प्रमोद व्हटकर आदी उपस्थित होते.

उपग्रहाद्वारे सर्वेक्षण, साडेसहा लाख खड्डे
झाडं लावण्यात येणाऱ्या ठिकाणांचे उपग्रहाद्वारे सर्वेक्षण होणार आहे. झाडांसाठी जिल्ह्यात २१ जून पर्यंत साडेसहा लाख खड्डे खोदून तयार आहेत. एक जुलैला प्रत्येक दोन तासांनी लावण्यात येणाऱ्या झाडांची आकडेवारी उपग्रहाद्वारे त्याचे अपडेट नोंदी ठेवण्यात येईल. वनक्षेत्रात लावलेल्या झाडांचे पुढील पाच वर्षांपर्यंत वनकर्मचारी त्याचे संरक्षण संवर्धन करणार आहेत.

^‘सैराट’मधील वाळलेल्याझाडावर चढून काहीजण फोटोग्राफी करतात. ‘त्या’ झाडाच्या शेजारी प्रेमाचे प्रतीक असलेल्या कदंबसह इतर झाडे लावण्याबाबत करमाळ्यातील वनकर्मचाऱ्यांना कळवले आहे. ‘सैराट’टीमला या मोहिमेत सहभागी करून घेण्यास आम्ही इच्छुक असून प्रयत्न सुरू आहेत.'' सुभाष बडवे, उपवनसंरक्षक,सोलापूर
सैराटमधील झाडाशेजारी वृक्षारोपण
आर्चीपरश्याचा ‘सैराट’प्रेम चित्रपटामध्ये एका वाळलेल्या झाडावर फुलल्याचे दाखवण्यात आले. हरित महाराष्ट्र अभियान निमित्त त्या झाडाच्या अवतीभोवती प्रेमाचे प्रतीक असलेली झाडे लावण्यात येतील. सेलिब्रिटी, निसर्गप्रेमींसह विविध घटकातील मान्यवरांना सहभागी करून वृक्षलागवड अभियानची ‘सैराट’ सुरवात वनविभाग करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...