आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: दोन नूतन नगरसेवकांंवर पोलिसांत हाणामारीचे गुन्हे दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
जमादार यांच्या घरात घुसून मारहाण, नगरसेवक सुरेश पाटलांवर गुन्हा नोंद
सोलापूर - भाजपचेन गरसेवक सुरेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाबूराव जमादार यांच्या घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण केली. याविषयी जमादार यांनी जोडभावीपेठ पोलिस चौकीत फिर्याद दिली आहे. सुरेश पाटील यांच्यासह उमाकांत अनिल नाईकवाडी, संतोष व्यंकट जरकल, बिपीन सुरेश पाटील, संदीप सुरेश पाटील, विनायक पाटील (रा. घोंगडेवस्ती, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. उमेश बाबूराव जमादार यांनी तक्रार दिली. 

महापालिका निवडणुकीत बाबूराव जमदार अपक्ष उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला. विजयी सुरेश पाटील यांच्या साथीदारांनी जमादार यांच्या घरासमोर मुद्दाम फटाके फोडले. यास उमेश जमादार यांनी विरोध केला. एक फटाका उडून अंगावर पडल्यामुळे मालाश्री जमादार या जखमी झाल्या. याचा जाब विचारण्यासाठी सुरेश जमादार गेले असता त्यांनाही मारहाण झाली. दरम्यान, पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अाल्यानंतर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जमादार यांच्या घरी जाऊन उमेश नाईकवाडी यांना मारहाण केली. घरातील साहित्याची मोडतोड केली. साहित्य फेकून दिल्याचे सांगण्यात अाले. सहायक पोलिस निरीक्षक बनसोडे तपास करीत अाहेत. 
 
नगरसेवक चंदनशिवे यांच्याकडून महावितरण अभियंत्यास मारहाण 
सोलापूर - महावितरणकंपनीचे सहायक अभियंता वसंत तानाजी जाधव (वय ३०, रा. मधुबन सोसायटी, वांगी रोड, सोलापूर) यांना बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक अानंद चंदनशिवे आणि अनिल चंदनशिवे यांनी मारहाण केली. 

सम्राट चौक परिसरात वीजपुरवठा बंद झाल्यानंतर जाधव पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी दोघांनी मुद्दाम वीज बंद केल्याचा आरोप करत जाधव यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली. वीजपुरवठा केंद्राकडून बंद झाला नसून, सम्राट चौकातील डीपी बंद पडल्याचा खुलासा जाधव करत राहिले. मात्र, दोघांनी अरेरावी केली. नगरसेवक चंदनशिवे यांनी चावीच्या किचेनच्या साह्याने मारहाण केली तर अनिल चंदनशिवे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. 

जाधव यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली अाहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून, शुक्रवारी मध्यरात्री तक्रार दाखल झाली. शासकीय कामात अडथळा अाणला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. सहायक पोलिस निरीक्षक जमादार तपास करीत अाहेत. मारहाणीची घटना घडली अाहे. तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...