आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनापरवानगी वर्गणी गोळा केल्यास दंड, मंडळांना परवाने काढण्याचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- सार्वजनिकउत्सवासाठी वर्गणी जमा करण्यापूर्वी सदरील मंडळाने साहाय्यक धर्मादाय कार्यालयाकडून रीतसर परवाने घेणे आवश्यक आहे. परंतु, नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांवर, व्यक्तींवर महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम १९५० मधील कलम ६७ नुसार दहा हजार रुपयांपर्यंत दंड ठोठवण्यात येणार आहे, अशी माहिती येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ (क) प्रमाणे सार्वजनिक कार्य धार्मिक धर्मादाय कार्यासाठी वर्गणी जमा करण्यासाठी साहाय्यक आयुक्त, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून परवानगी देण्यात येते. या कार्यालयाच्या परवानगीशिवाय वर्गणी, देणगी गोळा करता येत नाही, असे या कार्यालयाने पत्रकाद्वारे कळविले आहे. परवानगीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, मंडळ, समिती स्थापनेचा प्रस्ताव, अर्जातील ठरावातील माहिती, स्वाक्षऱ्या इतर कागदपत्रे सत्य असल्याबाबतचे शपथपत्र, मंडळ स्थापनेबाबत ज्या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो त्या ठिकाणचे तसेच उत्सव साजरा करण्याबाबतचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र, मागील वर्षीचे हिशेबपत्रके किंवा जर मंडळ किंवा उत्सव प्रथम वर्षीच साजरा केला जात असेल तर त्याचा उल्लेख शपथपत्रात असावा.

..तर लोकप्रतिनिधींचे प्रमाणपत्र आवश्यक
एखादेमंडळ प्रथमच उत्सव साजरा करीत असेल, तर त्यासाठी संबंधित विभागातील लोकप्रतिनिधींचे पत्र आवश्यक आहे. ग्रामीण भागासाठी सरपंच, ग्रामसेवक शहरी भागासाठी नगराध्यक्ष, नगरसेवक यांचे ‘हे मंडळ हा उत्सव प्रथमच साजरा करीत आहे. यापूर्वी या मंडळाने हा उत्सव साजरा केला नाही,’ अशा अाशयाचे प्रमाणपत्र मंडळातील सर्व सदस्यांची ओळखपत्रे आवश्यक आहेत. त्यामुळे संबंधित मंडळाने शांततेत उत्सव साजरे करण्याची जबाबदारी सदस्यांवरही येणार आहे.

आवाजावरही नियंत्रण हवे
सार्वजनिकउत्सवामध्ये नियमापेक्षा जास्त डेसिबलचे ध्वनिक्षेपक लावण्यात येतात. त्यामुळे अबालवृद्धांसह इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यावर नियंत्रण हवे.

सक्तीने वसुली ठरू शकते खंडणी
सार्वजनिकउत्सव साजरा करण्यासाठी सक्तीने वसुली करणे हा देखील गुन्हाच आहे. सक्तीने वसुली केल्यानंतर संबंधितांनी जर या प्रकाराबद्दल तक्रार दिली, तर मंडळाच्या सदस्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो.