आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतभेद संपले; मिळून काम करू; शिवसैनिकांची अस्वस्थता संपली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा - राजकीय स्वार्थासाठी माझ्यात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आमचे कसलेही मतभेद नाहीत, आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीवर मिळून भगवा फडकावू, असे सांगत शिवसेनेचे उपनेते आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी पाटील यांच्याबाबत प्रथमच भूिमका जाहीर केली. परंड्यात पाटील यांच्या निवासस्थानी सोमवारी (दि.२) उभय नेत्यांमधील राजकीय वादावर पडदा पडला. 
आठवडाभरापासून शिवसेनेचे उपनेते आमदार प्रा. तानाजी सावंत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यातील राजकीय मतभेद वाढले असल्यामुळे शिवसैनिकांत संभ्रमावस्था होती. त्यामुळे पाटील पक्षांतर करणार असल्याची चर्चा सुरू होती. ‘दिव्य मराठी’शी बोलताना पाटील यांनी प्रा. सावंत यांच्यावर अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त केली होती. पुणे येथे रविवारी माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांनी आ. सावंत पाटील यांच्यात औपचारिक बैठक घडवून आणली होती. त्यामुळे राजकीय वादंग शमणार असल्याची चर्चा होती. सोमवारी (दि.२ ) आमदार प्रा. तानाजी सावंत पारगाव येथील शिवसेना शाखेच्या उद््घाटनासाठी जिल्हा दौऱ्यावर आले होते. या वेळी सरमकुंडी येथे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी आ. सावंत यांचे स्वागत केले. तेथील कार्यक्रमानंतर आ. सावंत यांनी पाटील यांच्या निवासस्थानी भोजन घेतले त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार ओम राजेनिंबाळकर, राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद सदस्य दत्ता साळुंके, तालुका प्रमुख गौतम लटके, सावंत प्रतिष्ठानचे रामचंद्र घोगरे, डॉ. शहाजी मिस्किन, राजकुमार जैन आदींसह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी आ. सावंत म्हणाले, आमच्यामध्ये कसलेही मतभेद नव्हते, आमचे रक्ताचे नाते असून, नात्यामध्ये कोणीही फूट पडण्याचा प्रयत्न करू नये. काही राजकीय मंडळी स्वार्थ साधण्यासाठी गैरसमज पसरवतात, अशाना त्यांची जागा दाखवून देऊ. यापुढे सर्व निर्णय सर्वजन मिळून घेणार आहोत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत निष्ठावंत कर्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे.शिवसेनेचे जिल्हा प्रमुख,पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही. यापुढील काळात शिवसेनेच्या हातीच जिल्ह्यातील सर्व सत्ता केंद्रे असणार आहेत.दोन्ही नेत्यंामध्ये पुन्हा एकमत झाल्याने सेनेत उत्साहाचे वातावरण आहे. 

मला शिवसेना पक्षाने मोठे केले असून, मी माझ्या पक्षाला सोडून जाणार नाही. मी पक्ष सोडण्याच्या अफवा आहेत. शिवसैनिकांनी गोंधळून जाता कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. वाशी तालुक्यातील पारगाव येथे बोलताना त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. प्रा. तानाजी सावंत यांचा पारगाव सर्कल शिवसेनेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी राजाभाऊ राऊत, ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पक्ष सोडणार नाही पक्षांतर टळले 
ज्ञानेश्वर पाटील आ.प्रा.सावंत यांच्या राजकीय मतभेदामुळे शिवसैनिक सैरावैरा झाला होता.शहरात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात इच्छुक उमेदवारांची बैठक पाटील यांना वगळून झाल्याने शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे इच्छुक असलेले उमेदवार संभ्रमात सापडले होते.ज्ञानेश्वर पाटील पक्षांतर करणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू होती. त्यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख ॲड.जहीर चौधरी यांनी सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपचे कमळ हातात धरले.या पार्श्वभूमीवर सेना पदाधिकारी पक्षांतराच्या वाटेवर होते. तूर्त पक्षांतर टळले आहे. 

पक्षातील दूही दूर होणार? 
प्रा.तानाजी सावंत आणि ज्ञानेश्वर पाटील यांचे नातेसंबंध आहेत. त्यामुळेच उभय नेत्यांमध्ये राजकारणातील सूत जुळले. मतदारसंघात आ.प्रा.तानाजी सावंत यांनी शिवजल क्रांती योजनेच्या माध्यमातून नदी, नाला, ओढा रुंदीकरण, खोलीकरण सरळीकरण आदी कामे केली. पावसाने मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला. त्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुकही केले होते. मात्र, त्यानंतर प्रा.सावंत आणि पाटील यांच्यामध्ये दुही निर्माण झाली. परिणामी, पाटील नाराज होऊन पक्षांतर करण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे शिवसैनिकही अस्वस्थ होते. आता ही दूही संपण्याची शिवसैनिकांना आशा आहे. 
बातम्या आणखी आहेत...