आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीचे नियम पाळा, नाहीतर दंडाची पावती अापल्या घरी येईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते शनिवारी पोलिस अायुक्तालयात -चलन पाॅस (पॉइंट ऑफ सेल) मशिनच्या अाधारे दंड वसुलण्याचा आरंभ झाला. पाॅस मशिनचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दोघा तरुणांना पोलिस अायुक्तालयात अाणले. ईश्वर लंगडेवाले (रा. हुच्चेश्वरनगर) याला गुरुनानक चौकात ट्रीपल सीट जाताना पकडले तर सागर फटफटवाले (रा. बेडरपूल) याला सिव्हिल चौकात मोबाइलवर बोलताना पकडले. दोघांकडून प्रत्येकी २०० रुपये दंड अाकारण्यात अाला. 
 
ई-चलनकारवाई अशी 
महत्त्वाच्या२५ चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून त्याचे नियंत्रण पोलिस अायुक्तालयात अाहे. मोबाइलवर बोलणे, ट्रीपल सीट, रिक्षात अोव्हरसीट प्रवासी वाहतूक, नो पार्किंग झोन, चुकीच्या दिशेने ये -जा करणे, अडथळा करून वाहन थांबविणे हे चित्रीकरण तपासले जाईल. गाडीच्या नंबरवरून अारटीअो कार्यालयातून नाव पत्ता घेऊन त्याच्या घरी पोलिस दंडाची नोटीस देतील. परगावचे वाहन असेल तर पोस्टाने नोटीस पाठवण्यात येईल. यासाठी खास पथके नेमली अाहेत. 
 
पाॅसमशिन दंड असा :
सुरुवातीला १६ पाॅस मशिन अाले अाहेत. जागेवरच डेबीट- क्रेडीट कार्डने दंड भरता येईल. कार्ड नसेल तर रोख भरावे लागेल. महत्त्वाच्या चौकात, गर्दीच्या ठिकाणी, मुख्य महामार्गावर याचा वापर होणार अाहे. यावेळी पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण, अपर्णा गीते, पौर्णिमा चौगुले यांच्यासह सहायक अायुक्त, निरीक्षक कर्मचारी उपस्थित होते. 

स्मार्ट सिटीत पोलिस दलही स्मार्ट करा 
बाळे,सैफुल, जुळे सोलापूर हत्तुरेवस्ती या चार नवीन पोलिस ठाण्यासाठी प्रस्ताव िदला अाहे. त्याला मंजुरी द्यावी, अशी मागणी पोलिस अायुक्त महादेव तांबडे यांनी पालकमंत्री देशमुख यांच्याकडे केली. उड्डाणपुलाच्या खाली मोकळी जागा वाहतूक शाखेच्या चौकीसाठी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. पोलिस दलाचे अाधुनिकीकरण करण्यासाठी प्रस्ताव निवेदन तयार करून द्या, मुख्यमंत्री यांच्याशी बोलून मंजूर करण्यात येईल, असे अाश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. 
बातम्या आणखी आहेत...