आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तिप्रदर्शन करत माकपच्या 18 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिका निवडणुकीकरिता बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास माकपाच्या १८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. इच्छुक हे आपापल्या भागातून दत्तनगर येथे आले आणि त्यानंतर एकत्रित मोठी मिरवणूक काढून आपला अर्ज भरला. लाल झेंडे, लाल उपरणे, लाल गुलाल, लाल वेषभूषा ही या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. 

सकाळी १० वाजल्यापासून दत्तनगर येथे इच्छुकांची कार्यकर्त्यांसह गर्दी होत होती.
 मोदी परिसरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. दुपारी एक वाजेपर्यंत सर्वजण दत्तनगर येथे एकत्र जमले. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली. दत्तनगर ते नॉर्थकोट प्रशालेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे जागोजागी स्वागत करण्यात आले. माकपच्या कार्यर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता.
 
या वेळी माकपाचे जिल्हा सचिव अॅड. एम.एच.शेख, नसिमा शेख, सिध्दप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, नलिनी कलबुर्गी, सुनंदा बल्ला, युसूफ मेजर, हनीफ सातखेड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 
 
-आम्ही शहराचा चौफेर विकास करण्याचा संकल्प घेऊन जनतेसमोर जात आहोत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराचा विकास खुंटला आहे. यावर आळा घालण्यासाठी एक दबाव गट आवश्यक आहे. ही जबाबदारी माकपा पार पाडेल. यंदा माकपाने उच्चशिक्षित आणि तरुणांना संधी दिली आहे. आमचे उमेदवार निश्चित निवडून येतील. नरसय्याआडम, माजी आमदार
बातम्या आणखी आहेत...