आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांनी उभे केले आणि निवडूनही आणले- विजयाताई थोबडे (महाकौल)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - माझा आणि राजकारणाचा काहीही संबंध नव्हता. मात्र थोबडे वस्तीमधील लोक अनेक समस्यांशी संघर्ष करीत होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून दैनंदिन सुविधांपासून वंचित राहिले होते. १९९२ मध्ये थोबडे वस्ती येथील लोक आमच्याकडे आले आणि मला महापालिका निवडणुकीत उभे राहण्यास सांगितले. तेव्हा प्रथम माझा नकार होता आणि घरच्यांची इच्छा सुध्दा नव्हती.
 
 मात्र नागरीकांच्या हट्टापायी अखेर घरच्यांनी मला होकार दिला आणि मी प्रथम निवडणुकीत उभारले. ज्या विश्वासाने लोकांनी मला निवडणुकीत उभे केले तेवढ्यास विश्वासाने त्यांनी भरघोस मतांनी निवडून दिले. तेव्हा मी अव्वल क्रमांकाने निवडून आले. मला निवडणुकीसाठी काही जास्त खर्च आलाच नाही. प्रचारादरम्यान मला नागरिकांचा माझ्या प्रती असलेला प्रेम आणि माणुसकी दिसून आली. मी खूप भावुक झाले होते. 
 
निवडून आल्यावर त्यांनी माझा मोठा सत्कार केला होता. तो मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांचा विश्वास मी कधी तुटू दिला नाही. पाच वर्षात तेथे मी पाणी, रस्ते, दिवाबत्ती आदी कामे केली. त्यामुळे ते समाधानी झाले. पहिल्याच टर्म मध्ये मला कॉँग्रेस पक्षाने आरोग्य आणि स्थापत्य समितीचे चेअरमन पद दिले. पहिल्या वर्षी मला काही समजत नव्हते. मी सुशिक्षित असल्यामुळे कमी वेळेत मी सर्व प्रशासकीय काम शिकले आणि याचा वॉर्डाच्या विकास कामासाठी फायदा झाला. 
 
दुसऱ्यांदाही प्रभाग नवीन, तरी बहुमताने विजय 
१९९६मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत मला नीलमनगर परिसरातून मागणी आली. तेव्हा मी काहीही विचार करता त्या नविन भागात निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला. थोबडे वस्तीत मी जे विकासकामे केली त्यामुळे नीलमनगर परिसरात नागरिकांनी माझ्या उमेदवारीसाठी हट्ट केला. प्रचारादरम्यान विरोधकांनी माझ्यावर विरोधात मनमानी पध्दतीने काहीही प्रचार केला. 
मात्र या प्रचारासाठी बळी पडता नागरिकांनी मला बहुमताने निवडून दिले. तेव्हा मला महापालिकेच्या कामाचा अनुभव मिळाला होता. निवडून येताच मी तेथे काम सुरू केले.
 
या दुसऱ्या टर्ममधील शेवटच्या वर्षात मला स्थायी समितीचे चेअरमन पद देण्यात आले. मला खूप आनंद झाला कारण मी आत्ता नीलमनगर परिसरात जास्तीत जास्त निधी आणू शकते. मी तसेच केले आणि येथे जेवढे शक्य झाले तेवढे जास्तीत जास्त विकासकामे केली. यानंतर मी राजकारण कधी आले नाही, निवडणूक लढवली नाही.