आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 तासांनंतर मेनलाइनवरून रेल्वे सुरू, मंगळवारीही परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रविवारी मध्यरात्री दुधनी स्थानकावर मालगाडी रूळावरून घसरल्याने या मार्गावरील दक्षिण भारताकडे होणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर मेनलाइनवरून रेल्वे वाहतूक सुरू होण्यास १६ तास लागले. या अपघाताचा परिणाम मंगळवारी धावणाऱ्या गाड्यांवरही दिसून आला. 

मालगाडीच्या इंजिनसह आठ वॅगन रूळावरून घसरल्यानंतर सोलापूर रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून रेल्वेसेवा पूर्ववत आणण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी ९.२० वाजता लूपलाइनवरून वाहतूक सुरू करून दक्षिण भारताशी तुटलेला संपर्क पूर्ववत करण्यात आला तर दुपारी साडेचारच्या सुमारास दोन लूपलाइन मेनलाइन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. दरम्यान, १६ एक्स्प्रेसचे मार्ग बदलण्यात आले तर चार पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. अपघाताचा परिणाम मंगळवारीही दिसून आला. उद्यान एक्स्प्रेस उशिरा पाेहोचल्याने सिद्धेश्वर एक्स्प्रेसला सोलापूरला येण्यास साडेचार तासांचा उशीर झाला. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सिद्धेश्वर एक्स्प्रेस सोलापूरला पोहोचली. 

सुमारे ४०० कामगार क्रेनच्या मदतीने घसरलेल्या वॅगनला रूळावरून हटवण्याचे काम सुरू होते. सर्व वॅगन हटवल्यानंतर शेवटी इंजिनला हटवण्याचे काम मंगळवारी दुपारपर्यंत सुरू होते तर डीआरएम कार्यालयात अपघाताची कारणे शोधण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू होते. रेल्वे प्रशासनाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले अाहे. सोमवारी दक्षिण भारतात हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नईकडे जाणाऱ्या गाड्या व्हाया कुर्डुवाडी, लातूरमार्गे वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या गाड्यांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब लागला. 

या गाड्यांना उशीर 
कोइमतूर-कुर्ला एक्स्प्रेस गाडील साडेचार तास उशीर झाला तर मुंबई -नागरकोईल एक्स्प्रेसला साडेचार तास, हैदराबाद- मुंबई एक्स्प्रेस तास ४० मिनिटे, विजयपूर -सोलापूर पॅसेंजर ३० मिनिटे, सिद्धेश्वर एक्स्प्रेस साडेचार तास उशीर, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस तास मिनिटे उशीर झाला. 

युद्धपातळीवर प्रयत्न 
सोमवारी सकाळी साडेनऊपर्यंत एक लाइन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती तर दुपारपर्यंत मेनलाइनवरून देखील वाहतूक सुरू झाली होती. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून वॅगन हटवण्याचे काम केले.
- राजेंद्रकुमार शर्मा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर 
बातम्या आणखी आहेत...