आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेची नवी तिकीट खिडकी तयार, सेवेची प्रतीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रामवाडीजम्बो मालधक्क्याच्या बाजूला नवे तिकीट बुकिंग काउंटर तयार झाले. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर तत्काळ या काउंटरवरून जनरल तिकीट देण्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे दमाणीनगर, रामवाडी, सलगर वस्ती, देगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांची सोय होणार असून, मुख्य बुकिंग कार्यालयावरचा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. तसेच फलाटावरची गर्दी कमी होईल. 
 
गेल्या काही दिवसांपासून अभियांत्रिकी विभागाच्या प्रशिक्षण केंद्राजवळ नवे तिकीट काउंटरचे काम सुरू होते. भविष्यातील गरज पाहता रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी चार तिकीट खिडक्या तयार केल्या आहेत. सुरुवातीला दोन खिडक्यांवरून तिकीट दिले जातील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता तिकीट खिडक्यांच्या संख्येत वाढ केली जाईल. रामवाडीच्या बाजूने तिकीट काउंटर सुरू केल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भय्या चौकातून वळसा मारून जाण्याची गरज भासणार नाही. या भागातील नागरिकांना या काउंटरवर तिकीट काढून थेट रेल्वे स्थानकावर जाता येणार आहे. परिणामी स्थानकासमोरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत मिळेल. यामुळे वेळेची बचत होणार आहे. येत्या काही दिवसांतच हे काउंटर प्रवाशांच्या सेवेत रुजू हाेईल. 

^नवे तिकीट काउंटर बांधून सध्या तयार आहे. काउंटर सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्याकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. येत्या काही दिवसांतच याला मंजुरी मिळेल.” मनिंदर सिंगउप्पल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर 
बातम्या आणखी आहेत...