आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 13 लोहमार्ग सर्वेक्षणास 6.68 कोटी, मिरज-कुर्डुवाडी-लातूर लोहमार्गांचे होणार विद्युतीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सर्वसाधारण अर्थसंकल्पाअंतर्गत सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील १३ नव्या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी ६.६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात एकूण पाच नवीन मार्ग होणार असून त्यासाठी २८०४० कोटी रुपयांचा निधी  दिला जाईल. जेऊर-आष्टी तसेच फलटण- पंढरपूर यांचा  नवीन मार्गामध्ये समावेश आहे. मिरज-कुर्डूवाडी-लातूर या ३७७ किमीचे विद्युतीकरण तसेच  जेऊर-आष्टीसाठी  नवा मार्ग या प्रस्तावांचाही  अर्थसंकल्पात समावेश आहे.

या वर्षी राज्यात पाच नवीन लोहमार्गाचे काम  होणार आहे. त्यात जेऊर-आष्टी ७८ किलोमीटर,  फलटण-पंढरपूर १०५ किमी, हातकणंगले-इचलकंरजी ८ किमी या पश्चिम महाराष्ट्रातील मार्गांचा समावेश आहे. पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरा लोहमार्ग टाकण्यात येणार असून या सुमारे ६४ िकमी मार्गासाठी ४२५३ रुपये खर्च येईल. विरार-वसई-पनवेल मार्गावर नवा लोकल रेल्वे मार्ग टाकण्यात येणार असून या ७२ किमीच्या कामासाठी ८७८७ कोटी रुपये खर्च येणार आहे. सीएसटी  ते पनवेल या मार्गावरील जलद लोकल रेल्वे नवीन मार्गासाठी १२१३१ कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे.
  
लासूर-पोटूल येथे पूल उभारणी
नांदेड  विभागातील लासूर ते पोटूल स्थानकादरम्यानच्या मार्गावर ओव्हरबीज उभारण्यात येणार अाहे. याशिवाय हिंगोली आणि धामणी स्थानका दरम्यान ओव्हर ब्रिज बांधण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. 
 
शांकुतल रेल्वेचा पुनर्विकास
विदर्भातील मुर्तीजापूर-यवतमाळ (११३ किमी ),मुर्तिजापूर-अचलपूर (७७ किमी) आणि पूलगाव -आर्वी (३५ किमी) या मार्गावरून धावणाऱ्या शाकुंतल रेल्वेचे २१००.४६ कोटी रुपये खर्चातून पुनर्विकास करण्यात येणार आहे.

४ मार्गांसाठी तरतूद
अर्थसंकल्पात राज्यातील चार मार्गांच्या विद्युुतीकरणाचा प्रस्ताव आहे. दौंड-बारामती (४४ किमी), वणी-पिंपळखुटी (६६ किमी), मिरज-कुर्डूवाडी-लातूर (३७७ किमी) आणि गदग-होटगी (महाराष्ट्रातील २१ किमी) मार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. यासाठी ८६५.४०  कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...