आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटाचे ढग; तुरीसह द्राक्षाला तडाखा! ५९ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीच्या पिकांना होणार फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - संकटातून बाहेर येऊ पाहणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता लावणारा अवकाळी पाऊस पुन्हा शेतकऱ्यांच्या मागे संकट घेऊन दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्हाभरात बुधवारी (दि.१४) पहाटेपासून अचानक अवकाळी पाऊस ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत भर पडली आहे. वातावरणातील या अचानक झालेल्या बदलामुळे जिल्ह्यातील तूर, कांदा, कापूस द्राक्ष आदी पिकांना मोठा फटका बसणार असल्याचे दिसत असून दुसरीकडे रब्बीची ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांना मात्र या वातावरणाचा फायदा होणार आहे.

बंगाल च्याउपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तामीळनाडूसह आंध्र किनारपट्टीला वादळासह पावसाचा तडका बसला आहे. याच कमी दाबाच्या पट्ट्याचा मराठवाड्यासह परिसरातील हवामानावरही परिणाम झाला आहे. यातूनच बुधवारी पहाटेपासून उस्मानाबादसह जिल्हाभरात कमी अधिक प्रमाणात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण वातावरणातील गारठाही प्रचंड वाढल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात तूर, कांदा, कापूस या पिकांसह द्राक्षांचेही मोठे उत्पादन घेतले जाते. या वातावरणाचा सर्वाधिक फटका याच पिकांना बसणार असल्याचे दिसत आहे. तुरीचे पीक सध्या शेंगानी बहरले असून काढणीला आलेले आहे. मात्र, पावसामुळे वरचे टरफले फुटून शेंगाना तसेच पिकाला कीड लागण्याची शक्यता आहे. कापूसही सध्या वेचणीला असून पावसाचा वातावरणातील कारठ्याचा कापसालाही मोठा फटका बसणार आहे. कांदा पिकाची काढणी सुरू असल्याने या पावसामुळे तो सडण्याचा धोका निर्माण झाला आहे तर दुसरीकडे अगोदरच अडचणीत असलेल्या द्राक्ष उत्पादकांसमोरही या पावसासह गारठ्यामुळे मोठे संकट उभे टाकले आहे. हे वातावरण आणखी दोन दिवस कायम राहिले तर निसर्गाच्या कोपाचा पुन्हा शेतकऱ्यांनाच फटका बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्वारी, हरभरा, गव्हाला पोषक वातावरएकीकडे काही पिकांचे या अवेळी पावसामुळे नुकसान होणार असले तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे पीक रब्बीच्या ज्वारीला मात्र हा पाऊस तसेच वातावरण पोषक आहे. त्यामुळे रब्बीच्या ज्वारीचा उतार चांगला मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्याचबरोबर हरभरा गहू या पिकांनाही हा पाऊस वातावरण पोषक असल्याने ज्यांच्याकडे तूर, कांदा, कापूस तसेच ज्वारी, हरभरा, गहू असे दोन्ही पिकं आहेत. त्यांना कही खुशी कही गम म्हणण्याची वेळ आली आहे.

खामसवाडीयेथे पावसामुळे आठवडी बाजार विस्कळीत : कळंबतालुक्यातील खामसवाडी परिसरात बुधवारी झालेल्या संततधार पावसामुळे आठवडी बाजारातील व्यापाऱ्यासह ग्राहकांचीही मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे खरेदीसाठी ग्राहक फिरकलाच नाही. त्यामुळे आठवडी बाजारात भाजीपाला कवडीमोल दरात विक्री करावा लागला. ग्राहकच आल्याने अनेकांना भाजीपाला टाकून देण्याची वेळ आली.

हरभरा,तूर पिकावर आळीचा प्रादुर्भाव
पावसासहदिवसभर ढगाळ वातावरणामुळे हरभरा, तुर या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे फवारणी करण्यासाठी महागाची औषधे (खरेदी) करण्यास पुन्हा पैशाअभावी अडचण येणार आहे.खरीप हंगामात सोयाबीनचे हाताशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे वाया गेले होते. या पिकांच्या नुकसानीनंतर शासनाकडून अद्याप भरपाई मिळालेली नाही.

या अवेळीपावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे तूर, द्राक्ष, कांदा, कापूस आदी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामध्ये तुरीचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या औषधांची फवारणी करून घ्यावी. -शिरीषजमदाडे, कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, उस्मानाबाद.

पाथरुड परिसरातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ
परंडा तालुका परिसरात सर्वत्र ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे तूर,कांदा,कापुस तसेच द्राक्ष बागांना नुकसान होण्याचा संभव असून ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकाना पोषक वातावरण आहे. तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीचे पीक आहे. कांदा २४०० हेक्टर क्षेत्रावर असून त्याची काढणी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने कांद्यालाही फटका बसला आहे. परंडा तालुक्यात असलेल्या ८० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे २०,५४० हेक्टर क्षेत्रावरील रब्बी ज्वारीचे पीक सध्या जाेमात असून वातावरणातील गारवा ज्वारीस पोषक असल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. हरभरा ३३४० हेक्टरवर आहे तर गहू २९२० हेक्टरवर आहे. या पिकांना पोषक वातावरण असून १३०० हेक्टरवरील कापसाला मात्र फटका बसू शकतो.

१४ हेक्टरवरील तुरीच्या पिकाला परंड्यात फटका
बुधवारी दिवसभर भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने या भागातील तूरीचे पीक कापणी करून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा चांगलीच तारांबळ उडाली. तुरीचे पीक झाकण्यासाठी सकाळपासूनच शेतकरी पळापळ करत होता. अनेक शेतकऱ्यांची तूर पावसाने भिजल्याने काही प्रमाणात नुकसानही झाले. पावसाचा जोर वाढल्यास मात्र या भागातील तूर उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कळंब तालुक्या बुधवारी विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बीतील काही पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. यावर्षी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने समाधान कारक पाऊस झाला आहे . यामुळे विहीर बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, ज्वारी इतर पिकांना प्राधान्य दिले. या पिकांची तालुक्यात ५९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी वाजेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे या पिकांना फायदा होणार आहे. परंतु, तालुक्यात काही भागात कापसाचे पीक घेतले जाते. त्या शेतकऱ्यांना मात्र या पावसाचा फटका बसणार आहे.
बातम्या आणखी आहेत...