आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांचे देईपर्यंत लढा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर शिवा संघटनेने विद्यापीठास सिद्धेश्वर विद्यापीठ नाव देण्याची मागणी केली आहे. गेली १३ वर्षे आम्ही यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहोत. मात्र काही राजकीय मंडळी आपली पोळी भाजून घेण्यासाठी लिंगायत धनगर समाजात संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कोअर कमिटीतील सदस्य काळात धनगर समाजातील नेतेमंडळींशी चर्चा करतील. यानंतर कपिलधारा येथे नोव्हेंबर रोजी शिवा संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. हा लढा आता सोलापूर विद्यापीठास सिद्धेश्वरांचे नाव मिळेपर्यंत थांबणार नाही’, अशी घोषणा शिवा संघटनेेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी केली. 

सोलापूर विद्यापीठास सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या पुढाकाराने सोमवारी कोंतम चौकातील महात्मा बसवेश्वर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. होम मैदानावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

मंचावर शहर, जिल्ह्यातील मठांचे मठाधिपती यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वीरभद्रेश बसवंती यांनी प्रास्ताविक केले. आतापर्यंत ५५ आंदोलने करून हा प्रश्न मांडल्याचे सांगितले. गेली २२ वर्षे शिवा संघटना विविध मुद्द्यांवर आंदोलने केली आहे, यामध्ये सर्व आंदोलनास यश आल्याचे सांगून श्री. धोंडे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर विद्यापीठास सिद्धेश्वरांचे नाव देण्यास मंजुरी दिली होती. शिवाय उच्च तंत्र शिक्षण विभागाने तत्कालीन कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांना प्रस्ताव देण्यासंबंधी पत्रही दिले आहे. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही मागणी रखडली. आतापर्यंत शिवा संघटनेने कायद्याच्या चौकटीत राहून रचनात्मक पद्धतीने आंदोलने केली, कोणताही जातीभेद करता मागण्या मान्य करून घेतल्या. यामुळेच भविष्यकाळातही सोलापूर विद्यापीठास सिद्धेश्वरांचे नाव देण्यासाठी शासनाला भाग पाडू, यासाठी आपणास रचनात्मक पद्धतीने काम करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. 

भाषणात शशिकांत बिराजदार, विश्वनाथ चाकोते, नरसिंग मेंगजी, लक्ष्मण ढोबळे, राजशेखर शिवदारे, विरूपाक्ष शिवाचार्य मानुरकर, बार्शी, श्रीकंठ शिवाचार्य, नागणसूर, रेणुक शिवाचार्य मंद्रूप, नीलकंठ शिवाचार्य, धारेश्वर महाराज यांनी सोलापूर विद्यापीठास नाव देण्याच्या मागणीस पाठिंबा देत संघर्ष करण्याचे आवाहन केले 
 
यांची उपस्थिती 
माजीकुलगुरू डॉ. इरेश स्वामी, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, शिवशरण पाटील-बिराजदार, विश्वनाथ चाकोते, स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, प्रकाश वाले, मल्लिकार्जुन पाटील, राजशेखर हिरेहब्बू, शशिकांत बिराजदार, सुदीप चाकोते, अभय कल्लावार, शैलेश जक्कापुरे, वैजनाथ तोनसुरे, धन्यकुमार शिवनकरे, सिद्धाराम नंदर्गी, सिद्धय्या हिरेमठ यांची उपस्थिती होती. 

हलग्या कडाडल्या 
कोंतमचौकात सकाळी १० वाजल्यापासून मोर्चेकऱ्यांची गर्दी येथे जमा होत होती. झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, सिद्धेश्वर विद्यापीठ नामांतर झालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या जात होत्या. हलग्या, झांज ध्वज नृत्य सुरू होते. मोर्चा निघण्यास पावणे एक वाजले. गळ्यात भगवे शेले, डोक्यावर भगवी टोपी, कपाळावर विभूती भस्म हातात भगवी पताका घेतली होती. विभूती अष्टगंध लावण्याची सोय केली होती. 

पोलिसांचे चोख नियोजन 
पोलिसांच्याचोख वाहतूक नियोजनामुळे कुठेही वाहतूक विस्कळीत झाली नाही. समाचार चौक, राजेंद्र चौक, टिळक चौक, कुंभार वेस या परिसरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे ताफे जमा होत होते. पोलिसांनी ही वाहने वाहनतळांकडे वळवण्याची सोय उत्तम केली होती. काहीजण पारंपरिक बाराबंदी वेशात सहभाग दर्शवला, यात माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांचा समावेश होता. तसेच सहभागी शाळा, संस्था आणि संघटना यांनी शिस्तीने दर्शन घडवले. कोंतम चौकात सहराई अंजुमन मोहल्ला कमिटी, बागवान गल्ली यांनी पिण्याच्या थंड पाण्याची सोय केली होती. 

कोण काय म्हणाले.... 

आमदार सिद्धाराम म्हेत्रे
हा मोर्चा कोणा समाजाच्या विरोधात नाही. पण यापूर्वी केलेल्या मागणीस शासनाने मंजुरीही दिली आहे. यानंतर पाठपुरावा झाल्याने हा विषय रखडला आहे. खरे तर धनगर समाजाचे आभार मानायला हवेत, त्यांनी मोर्चा काढण्यासाठी लिंगायत समाजास जागे केले. सरकार निर्णय घेईपर्यंत संघर्ष करावाच लागेल.

सिद्रामप्पा पाटील
सोलापूर विद्यापीठास सिद्धेश्वरांचे नाव द्यावेच लागणार आहे. सिद्धेश्वरांचे नाव देण्यासाठी जे विरोध करतील त्यांना सोलापूरची जनता आणि सिद्धेश्वर बघून घेईलच. मात्र आता कितीही अडचणी आल्या तरी सिद्धेश्वरांचे नाव देण्यासाठी मागे हटायचे नाही. 

शिवशरण पाटील-बिराजदार
शिवा संघटनेने सर्वप्रथम नाव देण्यासाठी पुढाकार घेतला. तसा शासनाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावाही केला. मात्र मध्यंतरीच्या काळात पाठपुरावा करता आला नाही. सोलापुरातील प्रत्येक नागरिकांचा या मागणीस पाठिंबा असून, हा मोर्चा त्याचेच उदाहरण आहे. 

धर्मराज काडादी
सोलापूर विद्यापीठास नाव देण्यासाठी २८ नावे समोर आली आहेत. मात्र सिद्धेश्वरांचे नाव देण्याची मागणी जुनी आहे. जाणीवपूर्वक इतर समाजास पुढे करून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोलापूर ही सिद्धेश्वरांची जन्म आणि कर्मभूमी आहे. त्यांनी वचनातून जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान मांडले आहे. 
बातम्या आणखी आहेत...