आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणी लक्ष्मीबाई पुतळा चबुतऱ्याला भगदाड, मनपाने टाकले कापड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - धर्मवीर संभाजी तलावाशेजारी असलेल्या उद्यानात राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा एका दगडावर उभारण्यात आला आहे. तो दगड नसून दगडासारखी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ही प्रतिकृती ढासळत असून धोकादायक स्थिती झाली आहे. ही परिस्थिती गेल्या काही दिवसापासून अशीच आहे. हे चित्र लोकांना दिसू नये म्हणून महापालिकेने याच्या अवतीभवती पडदा मारला आहे. ‘दिव्य मराठी’ने याबाबत विचारल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत हालचाल सुरू झाली असून लवकरच याची दुरुस्ती होणार असल्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. 

राणी लक्ष्मीबाई यांचा शहरातील हा एकमेव पुतळा. नलिनी चंदेले महापौरपदी असताना हा पुतळा उभारण्यात आला, पुतळ्याभोवतालच्या जागेत सुंदर असे उद्यान केले. पुतळा, उद्यान, तलाव, रेल्वेची ये- जा असे सुंदर चित्र इथे पाहायला मिळाले. मात्र नागरिकांनी याचा योग्य वापर केला नाही. महापालिकेने देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पुतळ्यासह संपूर्ण उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे. ज्या दगडाच्या प्रतिकृतीवर पुतळा उभा आहे त्याठिकाणी सिमेंट निघाले आहे. पुतळा दगडावर उभारला नसून काँक्रिटच्या कॉलमवर उभारला आहे. पुतळ्याच्या सुंदरतेला डाग लागत आहे. 
 
राणी लक्ष्मीबाईपुतळा हा काँक्रिट कॉलमवर उभारला आहे. पुतळ्याखाली असलेल्या दगडाची प्रतिकृती खराब झाली असून त्याची पाहणी केली आहे. येत्या तीन दिवसात याच्या दुरुस्तीच्या खर्चाची मंजुरी घेऊन लगेच याचे काम सुरू केले जाईल. 
- झेड. ए. नाईकवाडी, झोन अधिकारी 
 
राणी लक्ष्मीबाई पुतळ्याची दयनीय अवस्था होत असेल तर याला मनपा शासन आणि प्रशासन जबाबदार आहेत.यापूर्वी याबाबत निवेदन दिले होते. याची दखल महापालिकेने घ्यावी. 
- नलिनी चंदेले, माजी महापौर 
 
बातम्या आणखी आहेत...