आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन पालकमंत्री, पाच जिल्हाधिकारी बदलले तरी पूर्ण होईना महसूल भवन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्ह्यातील सर्व विकासकामांवर नियंत्रण ठेवणारे मुदतीत काम करून घेणारे जिल्हाधिकारी यांच्या मुख्य कार्यालयात अर्थातच महसूल भवन गेली वर्षे रखडले आहे. महसूल भवनचे भूमिपूजन ते इमारत पूर्ण होईपर्यंत जिल्ह्याचे तीन पालकमंत्री आणि पाच जिल्हाधिकारी बदलून गेले. मात्र लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्याकडून पाठपुरावा होत नसल्याने ही इमारत अद्यापही अपूर्णच आहे. 


२००९ मध्ये भूमिपूजन झालेल्या महसूल भवनचे काम आजही अपूर्णच आहे. जिल्हाप्रशासनाने इमारत पूर्ण करण्यासाठी वाढीव निधीची शासनाकडे मागणी केली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक फर्निचरच्या कामांचा समावेश आहे. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कार्यालयांना जागा नाही. दोन मजली इमारतीमध्ये जिल्हा अभिलेख कक्ष, निवडणूक कार्यालय, भूसंपादन कार्यालय, अन्नधान्य िवतरण अधिकारी इतर कार्यालयांना जागा उपलब्ध नाही. यासाठी आणखी एक मजला वाढवण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याशिवाय याठिकाणी संरक्षक भिंत, सुशोभीकरण, फर्निचर, पाणीपुरवठा, विद्युतीकरण आदी कामे प्रलंबित आहेत. 


राजकीय वजन कमी पडले 
महसूलभवनचे भूमिपूजन ते इमारत पूर्ण होईपर्यंत जिल्ह्याची जबाबदारी असलेले पालकमंत्री, जिल्हाधिकारी बदलून गेले. मात्र इमारत पूर्ण झाली नाही. इमारतीच्या भूमिपूजनावेळी पालकमंत्री विजयसिंह मोहिते तर डॉ. जगदीश पाटील जिल्हाधिकारी होते. त्यानंतर पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, दिलीप सोपल, तर गोकुळ मवारे, प्रवीण गेडाम, तुकाराम मुंढे, रणजितकुमार हे जिल्हाधिकारी आले आणि गेलेही. चारही जिल्हाधिकारी यांनी इमारत पूर्ण करण्याबाबत पाठपुरावा केला असला तरी राजकीय वजन कमी पडल्याने इमारतीला निधी मिळू शकला नाही. 


इतर जिल्ह्यातील महसूल भवन पूर्ण 
सांगली,सातारा पुणे जिल्ह्यात महसूल भवन उभारणीसाठी सोलापूर जिल्ह्याच्या नंतर मंजुरी दिली. त्यांचे कामही उशिराने सुरू झाले. पण स्थानिक लोकप्रतिनिधींनी राजकीय वजन वापरल्याने अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्याने इमारती पूर्ण झाल्या. पुणे, सांगली सातारा या जिल्ह्यातील महसूल भवनचे लोकार्पण होऊन त्यामध्ये कामकाजही सुरू झाले आहे. 


वाढीव निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर 
महसूलभवन इमारतीसाठी कोटी ७० लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये फर्निचर, विद्युतीकरण इतर कामे करण्यात येणार आहेत. निधी उपलब्ध होण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. निधी मिळताच उर्वरित कामे पूर्ण करण्यात येतील.
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी


सहा एकर जागेवर उभारतेय इमारत 
सातरस्ता येथील सहा एकर जागेवर जानेवारी २००९ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते महसूल भवनचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी या प्रकल्पाची किंमत कोटी ५७ लाख इतकी होती. मात्र बांधकामास विलंब होत गेल्याने याची किंमत वाढून ती ११ कोटी ५८ लाख रुपयांवर गेली. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी अद्याप फर्निचर, इलेक्ट्रिक कामांसाठी स्वतंत्र कोटी ७० लाख रुपयांची मागणी केली आहे. हा निधी मिळाल्यानंतर काम सुरू होणार आहे. यामुळे आणखी वर्षभर तरी महसूल भवनचे काम होण्याची शक्यता कमीच आहे.

बातम्या आणखी आहेत...