आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना 10 हजार कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई - चंद्रकांत पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला तत्काळ दहा हजार रुपयांचे कर्ज विनाअट देण्यात येईल. यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकांसह इतर बँकांकडे पैसे नसतील तर त्यांनी राज्य बँकेकडे मागणी करावी,  त्यांना तातडीने साहाय्य करण्यात येईल. ज्या बँका शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तातडीचे कर्ज देत नाहीत त्यांच्यावर सहकार कायद्याच्या ७९ अ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.
 
तीन हजार कोटींच्या नोटा पडल्यामुळे राज्यातील जिल्हा बँक अडचणीत होत्या. त्यांच्याकडे कर्ज देण्यासाठी पैसे नव्हते. मात्र, अाता १४ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत जिल्हा बँकेत जमा असलेले पैसे रिझर्व्ह बँकेकडे जमा करावेत, ते बदलून देण्यात येतील, असेही पाटील म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...