आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समिती निवडणुकीत मतदानाचा शेतकऱ्यांनाही अधिकार !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
सोलापूर  - बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली आहे. या समितीमध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश करण्यात अाला अाहे. ही समिती ११ मे रोजी शासनाला अहवाल सादर करणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.  
 
राज्यात ३०६ बाजार समित्या असून २०१५-१६ या वर्षात ६५ हजार कोटींची अार्थिक उलाढाल झाली आहे. बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाचा खरेदी-विक्री व्यवहार होत असताना संचालक मंडळामध्ये मात्र शेतकऱ्यांना कोठेही स्थान नाही. बाजार समितीचा शेतकरी हाच प्रमुख कणा असून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा कायदा करण्यासाठी समिती अहवाल देणार आहे.  या निर्णयामध्ये शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन काही निकष लावून मतदानाचे अधिकार देण्यात येणार आहेत. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सातबाराधारक शेतकरी अाणि साखर कारखान्यांच्या धर्तीवर जे शेतकरी बाजार समित्यांना शेतमाल पुरवठा करतात तेच मतदानाचे हक्क बजावतील. यामुळे बाजार समित्यांच्या कामकाजात मोठा बदल होईल, अशी अपेक्षा सहकारमंत्री देशमुख यांनी व्यक्त केली.   
 
कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी बँकेच्या मालमत्तेची विक्री   
भूविकास बँकेच्या निवृत्त कर्मचारी व कार्यरत कर्मचाऱ्यांची २७० कोटी रुपयांच्या रकमा थकीत आहेत. शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली होत नसल्याचे कर्मचाऱ्यांची   थकीत देणी देता आली नाहीत. उच्च न्यायालयात कामगार संघटनांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर  न्यायालयाने अवसायनाच्या कामकाजास स्थगिती दिली आहे. ही याचिका मागे घेण्यासाठी सहकार आयुक्तांनी  कर्मचारी संघटनांची खासदार आनंदराव अडसूळ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा निर्णय घेतला अाहे. 
 
याशिवाय भूविकास बँकेच्या राज्यातील ६० मालमत्ता असून त्याची विक्री प्रक्रिया तातडीने सुरू करावी, शेतकऱ्यांकडे   थकीत असलेली रक्कमही माफ करण्याबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...