आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कि. मी. रस्त्यावर किरकोळ खड्डे, दुरुस्तीसाठी ३.६ कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जुना पुणे नाका ते रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर जाम मिलसह काही भागात किरकोळ खड्डे पडले असून संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. किलोमीटरच्या या दुरुस्ती कामाचा कोटी ६० लाख रुपयांना मक्ता िदला आहे. याबाबत विचारले असता हे काम "नियतकालिक' दुरुस्तीनुसार केले जात असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

नियमावर बोट ठेवून चांगल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी तत्पर असणारी ही सरकारी यंत्रणा इतर ठिकाणी रस्त्यांची वाट लागली तरी का हलत नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे. बोरामणी नाका ते शांती चौक या महामार्गावर जीवघेणे खड्डे आहेत, त्याकडे लक्ष देण्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाला वेळ नाही काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

नियतकालिक दुरुस्ती
राष्ट्रीयमहामार्ग विभागाच्या नियमानुसार रस्त्याचे काम झाल्यानंतर पाच वर्षांनी त्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. यालाच नियतकालिक दुरुस्ती (पिरॉडिकल रिपेअर) असे म्हणतात. यानुसार जुना पुणे नाका ते रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती केली जात आहे. जुना पुणे नाका ते रेल्वे स्टेशनपर्यंत तीन किलोमीटर लांबीचा रस्ता २०१०-११ मध्ये करण्यात आला होता. या कामास पंधरा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. तसेच पाच वर्षांत काही किरकोळ दुरुस्ती करण्यात आली होती. हा रस्ता सहा पदरीकरण करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून या रस्त्याचे काम झाले होते. मेहुल कन्स्ट्रक्शन कंपनीने हे काम केले होते.

रस्ता छान तरीही दुरुस्ती
- रस्ता खूप छान होता तरीही या रस्त्याची कुठल्या हिशोबाने दुरुस्ती केली जात आहे देव जाणे. ज्या ठिकाणी रस्ते खराब असतात त्याठिकाणी दुरुस्ती होत नाही, असे का? मोहन डांगरे, नागरिक

एवढे पैसे लागतात?
- जुना पुणेनाका ते रेल्वे स्टेशन रस्ता साडेतीन कोटींत दुरुस्त केला जात आहे. खरोखरच याकरिता एवढे पैसे लागतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सतीश कांबळे, नागरिक
नियमानुसारच सुरू आहे काम

- नियतकालिक दुरुस्तीच्या नियमानुसार जुना पुणे नाका ते रेल्वे स्टेशन हा रस्ता दुरुस्तीसाठी हाती घेतला आहे. रस्ता खराब झाला होता म्हणूनच दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे रस्ता बळकट आणि चांगला होईल. अशोक भोसले, उपविभागीयअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

यानंतर स्टेशन ते सोरेगाव रस्त्याचे काम घेणार हाती
या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर जुलै २०१५ रोजी मंजुरी मिळाली. मार्च २०१६ मध्ये कामाला सुरुवात झाली. कामाचा मक्ता मेसर्स पाटील अॅन्ड कंपनीला देण्यात आला असून नऊ महिने कामाचा कालावधी आहे. हा रस्ता दोन लेअरमध्ये पूर्ण केला जात आहे. हा रस्ता संपताच रेल्वे स्टेशन ते सोरेगाव या दहा किलोमीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...