आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर: 50 लाखांचा गुटखा पकडला; दोघे अटकेत, 250 पोती गुटखा आढळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
तुळजापूर: शहरालगत तुळजापूर ते उस्मानाबाद मार्गावर रविवारी (दि.१२) सकाळी साडेनऊच्या सुमारास पोलिसांनी ५० लाख रुपयांचा गुटखा वाहून नेणारा विनानंबर ट्रक पकडला.
 
ट्रकमध्ये हिना कंपनीचा २५० पोती गुटखा आढळला. याबाबत चालक जाहीद बुरूखान (२२), रामुराजू मंडलई (२० दोघे रा. बलसमुद, ता. कासरवाड, जि. खारगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्याम भंडारी, पोलिस कॉन्स्टेबल अमर माने, गोविंद पवार आदींनी कारवाई केली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...