आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईमुळे वाळू मार्केट कोलमडले; शहरात ३० लाखांची उलाढाल ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - महसूल प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे शहरातील वाळू मार्केट कोडमडले आहे. एकट्या जुलैमध्ये ११ कारवाया करत सुमारे नऊ लाख रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. शहरातील सांजा रस्त्यावर असलेले वाळूची वाहने गायब झाली आहेत. कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून बांधकाम करणाऱ्या नागरिकांचीही चांगलीच गोची झाली आहे. 
इमारतींचे बांधकाम करण्यासाठी वाळूला मोठी मागणी असते. गेल्या अनेक वर्षांपासून विविध नद्यांमधून वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. वाळूमुळे नदीतील पाणी पाझरत असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी व्यवस्थित राखण्यास मदत होते. मात्र, वाळू उपाशामुळे नद्यांमधील पाणी पुढे वाहून जाण्याचा प्रकार वाढला आहे. तसेच यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धुप होत आहे. किनाऱ्यावरील गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच नदीच्या काठांवर असलेली झाडी पूर्णपणे नष्ट झाली आहे. यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. यामुळे वाळू उपशासंदर्भात कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. रॉयल्टी भरणे, बाजार भावाप्रमाणे शासनाकडे पैसा भरणे असे प्रकार वाढले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा वाळू उत्खनन वाहतूकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून वाळू वाहतुकीवरचा फास उस्मानाबाद महसूल प्रशासनाच्या वतीने आवळला जात आहे. एका जुलै महिन्यात वाळूच्या ११ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नऊ लाख रुपये दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. तहसीलदार सुजित नरहरे अन्य महसूलच्या अधिकाऱ्यांची पथके रस्त्यावर घिरट्या घालत आहेत. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. बुधवारीही एक ट्रक पकडण्यात आला आहे. महसूल प्रशासनाच्या या कारवायांमुळे शहरातील वाळू व्यवसाय कोडमडून पडला आहे. शहरातील सांजा रस्त्यावर वाळूविक्री करणारी मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहत होती. मात्र, प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे ही वाहने थांबणे पूर्णपणे बंद झाली आहेत. सध्या तहसील कार्यालयाच्या आवारात पकडलेली वाहने उभी आहेत. 

३०लाखांचा व्यवहार थंडावला : उस्मानाबादशहरातून रोज ३० लाखांच्या वाळूची विक्री केली जात होती. अलिकडच्या काळात तर ३५ हजार रुपयांच्या चार ब्रास वाळूची ट्रक विकली जात होती. गेल्या पाच वर्षांपूर्वी केवळ आठ हजार रुपये दर होता. आता सुमारे चौपट दर झाला आहे. प्रशासनाच्या कारवाईमुळे ही उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

डस्टचा उपयोग : बांधकामासाठीवाळू मिळत नसल्यामुळे बांधकामे सध्या ठप्प आहेत. काहीजण वाळूच्या जागी डस्टचा उपयोग करत आहेत. मात्र, डस्टमुळे व्यवस्थित बांधकाम होत नसल्याचे सांगितले जात आहे. लवकरच बांधकामाला तडा जातो. यामुळे अनेकजण वाळूची प्रतीक्षा करत आहेत. 

कडेकोट सूरक्षा : वाळूभरलेले वाहन आढळले तरी कारवाई करण्यात येत आहे. यामुळे वाळू माफियांनी आता रस्त्याच्या कडेला वाळू आणून ठेवणे सुरू केले आहे. ही वाळू तहसीलच्या पथकाचा डोळा चुकवून विकली जात आहे. गंगाखेडहून वाळू आणण्याचे प्रमाण अधिक आहे. तेथून वाळूचा ट्रक अाणताना मागे पुढे वाहनांचे संरक्षण असते. पुढील वाहन कारवाई सुरू नसल्याची शहानिशा करते. ट्रक नादुरूस्त झाला तर यंत्रणा तयार असते. अशा सुरक्षेत डोळा चूकवून वाळू आणली जाते. 

वाळूसोबतच मुरूम, दगडाची अवैध वाहतूक उत्खनन करण्याचे प्रकार घडत आहेत. यामध्ून जिल्ह्यात जून अखेरपर्यंत दंड करापोटी १३ कोटी तीन लाख ५५ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यामध्ये खानीच्या लिलावापासून मिळालेल्या उत्पन्नाचाही समावेश आहे. 

जिल्ह्यात १३ कोटी वसुली 
बेकायदा प्रक्रिया 
विविध ठिकाणी वाळू उत्तखननासाठी शासनाने ठेके दिले आहेत. प्रत्येक ब्रासचा बाजार भाव रॉयल्टी ठरवण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाळूचा बाजारभाव ब्रासला ४५०० तर रॉयल्टी ४०० रुपये आहे. मात्र, दर रॉयल्टी देताच अवैध उत्खनन करून वाळू आणली जाते. तसेच कमी रायल्टी देऊन अधिक वाळू आणण्याचा प्रकार होतो. वाहतूक प्रकरणात ब्रासमागे २२ हजार ९४० तर उत्खनन प्रकरणी ११ हजार १६५ दंड वसुलीची कारवाई होते. 

उन्हाळ्यात माती, पावसाळ्यात वाळू 
उन्हाळ्यात तलावातील काळी माती शेतीमध्ये टाकण्यासाठी अधिक क्षमतेच्या टीप्परचा उपयोग केला जात होता. मात्र, हेच टीप्पर पाऊस पडल्यानंतर वाळूच्या वाहतुकीसाठी वापरले जात आहेत. विशेष म्हणजे टिप्पर भरल्यावर त्यावर ताडपत्री, मेनकापडाचे आच्छादन टाकून वाळू लपवण्याचा प्रयत्न हाेत आहे. प्रशासनाचे अशा वाहनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

कारवाई सुरूच ठेवणार 
^बेकायदा वाळूविक्रीवर कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक रस्त्यावर महसूल प्रशासनाची नजर आहे. यासाठी मंडळ अधिकारी तलाठ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. -सुजित नरहरे, तहसीलदार.
बातम्या आणखी आहेत...