आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळू घाटामधील उपसा बंद, नवीन कंत्राटही संपुष्टात; ठेकेदारांनी ‘साठा’ केला सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - राज्यभरातील वाळू घाटातील वाळूचा उपसा शासनाने बंद केला असून, नवीन कंत्राटही संपुष्टात येत आहेत. नवीन लिलाव आगामी काळात घेण्यात येणार आहे. आता घाटावरील उपसा बंद होणार असल्याने ठेकेदारांनी वाळूचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. कंत्राटदारांना जिल्हयातील वाळू घाटाचा ठेका देण्यात आला होता. या वाळू घाटातून जवळपास ठरल्यानुसार ९२ हजार ४८९ ब्रास वाळूचा उपसा होणे अपेक्षित आहे. मात्र मोठया प्रमाणात वाळू उपसण्यात येत आहे.
 
जिल्ह्यात सन २०१६-१७ करता वाळूचे कंत्राटापासून कोटी ६४ लाख ५३ हजार ४७० रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र या पासून कोटी ६० लाख ४६ हजार २२३ रुपये इतका महसुल प्राप्ती शासनाला झाली आहे. वाळूची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. मात्र, मोजमाप नसल्याने कंत्राटदार मोठया प्रमाणात वाळूचा उपसा करत आहे. तर दुसरीकडे अवैध प्रकारे रेती उपसा केल्या जात आहे. महसुल विभागामार्फत अशा अवैध प्रकारे वाळू तस्करीवर कारवाई होत असली तरी अवैध तस्करी करणारे मात्र आपला व्यवसाय तेजीत सुरु ठेवत आहे. तर दुसरीकडे लगतच्या वाशीम, जालना जिल्ह्यातही बुलडाणा जिल्ह्यातून वाळू तस्करी केल्या जात आहे. याची जाणीव मात्र महसुल अधिकाऱ्यांना होत नाही की त्यांचीही मिलीभगत आहे. अशा प्रश्न चर्चिल्या जात आहे. मोठया प्रमाणात वाळू उपसा करुन त्याचा साठा केल्या जात आहे. 
 
मोठे कन्स्ट्रक्शनचा हात मोठा : जिल्ह्यातच नव्हे तर लगतच्या जिल्ह्यातही मोठमोठे कन्स्ट्रक्शन, अपार्टमेंट उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. हा नवीन व्यवसाय तेजीत असून, त्यापासुन मिळणारे उत्पन्नही लवकर भरभराट करणारे असल्याने वाळू तस्करीत अशा व्यावसायिकांचाही हात आहे. एकाच वेळी बोलणी करुन वाळू इतर साहित्य बोलाविण्यात येत असल्याने त्यातही फायदा होत आहे. जिल्हयातील वाळू अशाच कन्स्ट्रक्शन धारकांच्या गळी उतरली आहे. या वाळूचा साठाही करुन लगतच्या वाशीम जिल्ह्यात देऊळगाव राजा, मेहकर आदी भागातून वाळू जात असल्याने अधिकाऱ्यांचेही त्यात साटेलोटे तर नाही, अशी शक्यताही व्यक्त केल्या जात आहे. 
 
वाळू घाट असलेलेे तालुके 
देऊळगावराजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, मलकापूर, नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद. आदी ठिकाणी वाळू घाट आहे. यामध्ये संग्रामपूर ३२ घाट, जळगाव जामोद घाट, शेगाव घाट, मलकापूर नांदुरा प्रत्येकी घाट, लोणार घाट,मेहकर घाट, सिंदखेड राजा घाट, देऊळगाव राजा घाट. 
 
घर बांधकाम करतांना लुट 
वाळू काय ब्रॉसने विक्री केल्या जावी. या वर कोणतेही निर्बंध नाही. कंत्राट घेतांना कोट्यवधी रुपये जर त्यात गुंतविल्या जात असतील तर हा गुंतवलेला पैसा लवकर बाहेर निघावा या करता कंत्राटदार इतरांना वाळू देत असून ही साखळी पध्दतीने वाळू नागरिकांपर्यंत पोहचते. घर बांधकाम करतांना त्यालाही मिळणारी वाळूची किंमत हजाराेंच्या घरात पोहचून त्याची सर्रास लुट केल्या जात आहे.प्लॉट विकत घेतला त्यापेक्षा घर बांधकामालाच जास्त रक्कम लागत असल्याचे बोलल्या जाते. 
 
बातम्या आणखी आहेत...