आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाळू वाहतूक, सहा वाहने जप्त, सुमारे १२ लाख रुपयांचा दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अवैधवाळू वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांवर सोमवारी पहाटे सैफुल चौक ते होटगी नाका या परिसरात ‘उत्तर सोलापूर’च्या तहसीलदारांनी कारवाई केली. यातील वाहने सदर बझार पोलिस ठाण्यात तर एक वाहन विजापूर नाका पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. वाहनांना १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

भंडारकवठे येथील नदी पात्रातून विनापावती वाळू वाहतूक करणाऱ्या सहा वाहने सैफुल चौक ते होटगी नाका येथे पकडण्यात आली. संबंधित ट्रकचालकांकडे चौकशी केली असताना भंडारकवठे येथून वाळू आणल्याचे सांगितले. एमएच १४ एएच ६३७५, एमएच १२ ईएफ ९८५९, एमएच ०६ के ७८४८, एमएच ०६ के ७२८७, एमएच १४ एएच ६८१३ एमएच ०४ बीजी ८००६ या वाहनांमध्ये प्रत्येकी साडेचार ब्रास इतकी वाळू भरण्यात आली होती. अवैध विना पावती वाळू वाहतूक करणाऱ्या एका वाहनास लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. शिवाय वाहनाचा वाहतूक परवाना निलंबित करण्याची शिफारस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात येणार आहे. ही कारवाई मंडलाधिकारी अनिल शहापुरे, गुडनाळे यांच्या पथकाने केली.

कारवाईची शिफारस
भंडारकवठेयेथून विनापावती वाळू वाहनांमध्ये भरली जात आहे, हीच वाळू विक्री केली जात आहे. यामुळे भंडारकवठे येथे वाळू उपसा करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, असेही प्रांताधिकारी यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.