आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक बांधिलकी | बेटी बचाव, बेटी पढाओ साठी रत्नाकर बँकेने घेतला पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आरबीएलबँकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी बेटी बचाव, बेटी पढाओ यासाठी पुढाकार घेतला असून, उम्मीद १००० या उपक्रमांतर्गत सायकलने प्रवास करून प्रबोधनाचे कार्य सुरू केले आहे. डिसेंबरला यास सुरुवात झाली असून १८ डिसेंबरला या उपक्रमाची हैदराबाद येथे सांगता होणार आहे.

या उपक्रमांतर्गत बुधवारी सकाळी साडेसहा वाजता एम्प्लॉयमेंट चौकातील ध्रुव हॉटेलजवळील बँकेच्या शाखेजवळून सायकलीवरून प्रभात फेरी काढण्यात आली. मुंबईजवळील पनवेल शाखेपासून संघनायक जस्मित सिंग यांच्या मार्गदर्शननुसार १३ कर्मचारी अधिकारी यासाठी सायकलवरून प्रवासास निघाले आहेत. ते बुधवारी साेलापुरात आले. यावेळी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाईक, मुदस्सर मुजावर, संकेत सूर्यवंशी, मनीषा भावर्थी, सुनील पाटील, सुहास शिंदे, महेश जोशी, महेंद्र तावरे, सुनील एकबोटे, चंद्रशेखर गायकवाड, शुभांगी पोतदार, दीपक नारगुडे, विनायक हुल्ले, सोज्वल शिंदे, हेमंत पाटील, गणेश जाधव, दत्तात्रय माने आदींची उपस्थिती होती. फेरीसाठी शिक्षक सचिन मगदूम म्हमाणे यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमास नागरिकांसह पोलिसांचे सहकार्य लाभले.

सायक्लोथॉन चॅप्टर थ्री हे ब्रीद
बुधवारी सकाळी सात वाजता सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी लोकमंगल फाउंडेशनचे अविनाश महागावकर यांच्या हस्ते या फेरीचा फ्लॅग ऑफ झाला. सायक्लोथॉन चॅप्टर थ्री असे या उपक्रमाचे ब्रीद अाहे. या उपक्रमात रत्नाकर बँकेबरोबरच सोलापुरातील सिद्धेश्वर प्रशालेचे कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले.

उपक्रमामागे हा आहे उद्देश
स्त्रीवंशवाढावा आणि मुलींना शिक्षण मिळावे, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या प्रवासात नागरिकांकडून बँक कर्मचारी अधिकाऱ्यांकडून ५० लाख रुपये निधी संकलित करण्याचा मानस आहे. आतापर्यंत ३० लाख रुपये जमा झाले असून, हैदराबाद येथे पोहोचल्यावर संकल्पसिद्धी होईल. हा संकलित झालेला निधी हैदराबाद येथील स्त्री शिक्षणाचे कार्य करणाऱ्या उद्भव संस्थेस देण्यात येणार आहे.
प्रशांतनाईक, व्यवस्थापक
बातम्या आणखी आहेत...