आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेची पहिला घंटा वाजली, फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहर जिल्ह्यातील शाळांची महिनाभराच्या सुटीनंतर गुरुवारी पहिली घंटा वाजली. विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. महापालिका शाळेमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. विद्यार्थ्यांना रिक्षा, कारमधून आणून प्रवेशोत्सव साजरा केला. काही शाळांमध्ये वृक्ष लागवड औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 
 
महापालिका शाळा क्र.५ मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सजवलेल्या कारमधून शाळेत आणले. पहिलीच्या वर्गात दाखल होणाऱ्या मुलांना शाळेविषयी भीती दूर व्हावी, शिक्षक शाळाविषयी आपुलकी निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अमोल भोसले यांनी स्वत:च्या कारमधून विद्यार्थ्यांना शाळेत आणले. स्वागत झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, गुरुसिद्धप्पा बनगोंडा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके, बॅग वाटप करण्यात आले. यावेळी नागेश वाघमारे, परशुराम सकट, किरण शळगे, अफरीन शेख उपस्थित होते. 

जोडबसवण्णा चौक येथील मनपा मुलांची शाळा क्र. मधील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चक्क शिक्षकांनी रिक्षातून आणले. भगवान झोपडपट्टी, पाच्छा पेठ, रविवार पेठ आदी भागातून विद्यार्थ्यांना शाळेत आणले. विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तक मोजकेच विद्यार्थ्यांना गणवेश देऊन स्वागत केले. यावेळी अश्विनी लांबतुरे, आनंद सामल, उमेश युवनाती, स्वाती फुटाणे, संपदा जोशी आदी उपस्थित होते. 

महापौरांनी शाळेची वाजवली घंटा 
मराठीउर्दू कॅम्प शाळेची घंटा महापौर शोभा बनशेट्टी यांनी वाजवली. कॅम्प संकुलामध्ये मराठी उर्दू शाळेमधील मुलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्य वाटप केले. दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवलेल्या पालिका शाळेमधील विद्यार्थ्यांचा गौरव केला. प्रास्ताविक महापालिका शाळांविषयी माहिती प्रशासनाधिकारी सुधा साळुंके यांनी दिली. सात हजार वह्यांचे संकलन झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी बोलताना महापौर म्हणाल्या की पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा कल वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, समाजामध्ये जागृतीपर कार्यक्रम घ्यावेत. यासाठी आवश्यक असलेली मदत शिक्षकांसाठी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे महापौर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक संतोष भोसले, माजी महापौर यू. एन. बेरिया, संतोष बुलबुले उपस्थित होते. 

वृक्षारोपण करून सुरुवात 
जय मल्हार प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली. विद्यार्थ्या मार्फत स्त्री- पुरुष समानता, हुंडाबळी, झाडे लावा झाडे जगवाचे संदेश देण्यात आले. यावेळी दिगंबर ढेपे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
बातम्या आणखी आहेत...