आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा वर्धापनदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भारतीय जनता पक्षाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यात ३५० जणांनी रक्तदान केले. तसेच स्वच्छता शिबिर, वृक्षाराेपण, पाणपोई, आरोग्य शिबिरसह शहर कार्यालयात खासदार अॅड. शरद बनसोडे यांच्या हस्ते ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

पक्षाच्या कार्यालयासमोर शहरध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. ध्वजवंदनावेळी पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बसवंती मंगल कार्यालयात वीरभद्र बसवंती यांच्या हस्ते ज्येष्ठ कार्यकर्त्यांना मोबाइल वाटप करण्यात आले.

३५० जणांचे रक्तदान
भाजपच्यावतीने मंडल पाचमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. घोंगडे वस्ती परिसरात राजकुमार पाटील यांनी आयोजित केलेल्या शिबिरात १३० बाटल्या रक्तदान झाले. मंडल पाचमध्ये ३५० बाटल्या संकलन झाले. विडी घरकुल येथे शहर भाजप अध्यक्ष प्रा. निंबर्गी यांच्या हस्ते कमळ पूजन करण्यात आले. यावेळी विजय इप्पाकायल, नगरसेवक अविनाश पाटील, संजय कोळी आदी उपस्थित होते.

प्रभागक्रमांक ४७ मध्ये स्वच्छता मोहीम
प्रभागक्रमांक ४७ मध्ये आदित्य नगर, जाई-जुई नगर, परिहार अपार्टमेंट परिसरात स्वच्छता मोहीम शिवरत्न गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आली. यावेळी भाजपने केलेल्या कामाची माहिती नागरिकांना देण्यात आले. यावेळी सुभाष पाटील, आेम इंगळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात१०३८ रक्तदान
जिल्हाभाजपच्या वतीने जिल्ह्यात १०३८ जणांनी रक्तदान केले. याशिवाय दुष्काळात गरजूंना मदत करण्यात आली. मंद्रूप येथे भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. शहर दक्षिण मतदार संघात विविध कार्यक्रम घेण्यात आले. मार्डी येथे मुद्रा कर्ज वाटप, बेटी बचाव संदेश आदी कार्यक्रम झाले.

भाजपचे कार्यकर्ते अमित राऊत यांनी उत्तर कसब्यात पाणपाई सुरू केली. उद््घाटन दमाणी अंधशाळेतील विद्यार्थी सूरज सोनटक्के, शिवशंकर पाटील, कमलदीप हुचीकुट्टी, बसवेश्वर तोडकरी यांनी केले.

शहर भाजप कार्यालयात शहर अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी खासदार अॅड. शरद बनसोडे, आदी.