आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेेश्वर कारखाना: विरोध लक्षात घेऊन पाडकामाऐवजी चिमणीची पाहणी करून पथक परतले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विमान उड्डाणास अडचणीची ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी गुुुरुवारी पोलिस बंदोबस्तात जाऊन मनपाच्या अधिकाऱ्यांनी मक्तेदारासमवेत पाहणी केली. मात्र येथील कामगार आणि शेतकऱ्यांचा विरोध पाहता आज कामाची सुरुवात झाली नाही. शुक्रवारी पोलिसांच्या बंदोबस्तात पाडकाम करण्याचे नियोजन मनपा अधिकाऱ्यांनी केले आहे.
 
चिमणी प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल याचिका निकाली काढण्यात आली असून पाडकामास कोणतीही स्थगिती दिली नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. दरम्यान चिमणी पाडकामाच्या विरोधात कारखान्याचे कामगार आणि शेतकरी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. 
 
विरोध कायम 
चिमणी पाडकाम करू नये या मागणीसाठी कारखान्याचे कामगार, सभासद शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. सात रस्ता येथून सकाळी वाजता मोर्चास सुरुवात होईल. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन चिमणी पाडकामास विरोध करणार आहेत. 
 
चिमणी प्रकरणी याचिका निकाली काढली 
चिमणीपाडकाम करण्यास विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर डिसेंबर महिन्यात सुनावणी होणार होती. पण महापालिकेने चिमणी पाडकामाचे १५ दिवसांची वर्कआॅर्डर दिल्याने त्या याचिकेवर निर्णय व्हावा, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली. त्यामुळे त्यावर गुरुवारी सुनावणी होऊन ते निकाली काढण्यात आल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. चिमणी पाडकामास न्यायालयाने स्थगिती दिली नाही. यावेळी एअरपोर्ट, केंद्र राज्य सरकारच्या वतीने वकील उपस्थित होते. चिमणी पाडकामास न्यायालयाची स्थगिती नाही, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

सिद्धेश्वर कारखान्याचीचिमणी पाडण्याचा मक्ता अखेर दिला गेला. तरी हा निर्णय चुकीचा ठरण्याचीच दाट शक्यता आहे, अधिकाऱ्यांनी याचा पुन्हा अभ्यास करावा. हा विषय प्रतिष्ठेचा झाल्यामुळे लांबला आणि आता घाई होत आहे. विमान सेवा सुरू झाली तर ती किती दिवस सुरू राहील याची सर्वांना मनातून शंका आहे. सुरू झालीच तर दिवसाकाठी जास्तीत जास्त उड्डाणे होतील. एवढ्या कमी वापराला एक धावपट्टी पुरेशी आहे चिमणी पाडण्याची गरज भासणार नाही. एकाच दिशेने विमान वर जाणे आणि खाली येणे खूप छोट्या विमानतळावर होते. जेव्हा काही दिवस विमान सेवा चालू होती, तेव्हा चिमणी होती. पूर्वी दोन वेळा विमानसेवा बंद पडली अाहे. म्हणून कमीत कमी सहा महिने सलग सोलापूरहून आवश्यक तेवढी प्रवासी वाहतूक मिळाली तरच चिमणी पाडण्याचा विचार करावा. 
- हरि गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते 
 
काही मंडळीचे कारस्थान 
होटगी विमानतळ वाढण्यास मर्यादा नाही, असे शासनाने यापूर्वी सांगितले आहे. या विमानतळाच्या जागेची विक्री करून त्या पैशातून बोरामणी विमानतळ उभारणार आहे. दोन वर्षात अनेक विमान उडाले कधी अडचण आली नाही. असे असताना अडचण दाखवून काही मंडळी कारस्थान करत आहेत. कामगार शेतकरी मोर्चा काढून भावना व्यक्त करणार आहेत. न्यायालयाने स्टे देणे माझ्याकडे नाही. एअरपोर्ट कडे अपिल करा, असे म्हणाले आम्ही, अपिल केले. पाडकामास आमचा विरोध आहे. 
- धर्मराज काडादी, चेअरमन, श्री सिध्देश्वर कारखाना 
बातम्या आणखी आहेत...