आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी १५ दिवसांत पाडणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विमानसेवा सुरू होण्यास अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी येत्या १५ दिवसांत पाडली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली. 
 
राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयास सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली असून, मक्तेदारही मिळाला अाहे. 

सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत विमानसेवेचा आढावा घेण्यात आला, यात चिमणी पाडण्याबाबत जिल्हा प्रशासनाने टेंडर प्रक्रिया राबवली आहे, येत्या १५ दिवसांत चिमणी पडणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी बैठकीत स्पष्ट केले. पाच वेळा टेंडर काढले, मात्र चिमणी पाडण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते. चिमणी पाडण्याचे स्पष्ट अादेश असूनही त्याची मक्तेदार मिळाल्याने अंमलबजावणी झाली नाही. महापालिकेनेही चिमणी पाडण्याचे धाडस दाखवले नाही. मक्तेदार मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. 

मक्तेदार आले 
^चिमणी पाडकामास एक मक्तेदार इच्छुक आहे. सविस्तर माहिती पुढील प्रक्रियेत स्पष्ट होईल. चिमणी पाडकामाची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.” संदीपकारंजे, उपअभियंता मनपा बांधकाम परवाना 
 
सरकारी आदेशाबाबत मला माहिती नाही 
^चिमणीच्या संदर्भातील प्रोसेस सुरू असून, ती पाडली जाऊ नये, यासाठी प्रयत्न आहेत. यासाठीची परवानगी मागितली आहे. चिमणी पाडण्यासंदर्भातील दिलेल्या आदेशाबाबतची माहिती मला नाही.'' धर्मराज काडादी, अध्यक्ष, सिद्धेश्वर कारखाना 

विमानतळांच्या निकषानुसार विमानतळाच्या दोन्ही बाजूने विमानाचे लँडिंग टेकऑफ होणे गरजेचे असते. चिमणी असल्या कारणाने सोलापूर विमानतळाच्या एकाच बाजूने विमानाचे लँडिंग टेकऑफ होत आहे. चिमणीच्या बाजूने टेक ऑफ करण्याचा प्रयत्न केला तर चिमणीमुळे विमानाचा अपघात होऊ शकतो. कारण ते धावपट्टीच्या मार्गावरच आहे. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून विमाने एकाच दिशेने उतरत उड्डाण घेत आहेत. छोट्या विमानांना चिमणीचा अडसर नसला तरीही एटीआर -७० सारख्या मोठ्या विमानांना याचा फटका बसू शकतो. त्यामुळे मोठ्या विमानसेवा देणाऱ्या कंपनीने चिमणी हटवणे गरजेचे असल्याचे सांगितलेे आहे. 

सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडकामास मक्तेदार मिळाला 
सोलापूर - विमानतळास अडसर ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडकामास चार वेळा जाहीर प्रसिद्धीकरण करूनही मक्तेदार मिळत नव्हते. पाचव्या वेळेस प्रसिद्धीकरण केले असता, नाशिक येथील विहान कन्स्ट्रक्शनने चिमणी पाडकामास पुढे सरसावत महापालिकेत टेंडर भरले. चिमणी पाडकामास कालमर्यादा काय? रक्कम किती यांची माहिती गुरुवारी टेंडर उघडल्यावर स्पष्ट होणार आहे. 

महापालिकेचा परवाना घेता सिद्धेश्वर साखर कारखान्याने चिमणी उभी केली. सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विमानसेवेस ती अडसर ठरत असल्याने ती पाडावी, असा आदेश शासनाने काढला. त्यासाठी शासनपातळीवर बैठका झाल्या. 

महापालिकेने चिमणी पाडकामासाठी यापूर्वी चारवेळा टेंडर काढले. पण त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने पुन्हा जाहीर प्रसिद्धीकरण केले असता, नाशिक येथील विहान कन्स्ट्रक्शन कंपनीने चिमणी पाडकाम करण्याची तयारी दर्शवली. त्याचे एकमेव टेंडर आल्याने गुरुवारी आर्थिक बाबींचा मक्ता उघडण्यात येणार आहे. त्यात चिमणी पाडकामास किती कालावधी लागेल. दर याबाबत माहिती समजू शकेल.
बातम्या आणखी आहेत...