आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: चारित्र्याचा संशय घेऊन तीक्ष्ण हत्याराने बहिणीवर वार; भावास दोन वर्षे सश्रम कारावास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- चारित्र्याचा संशय घेऊन बहिणीवर तीक्ष्ण हत्याराने सोडवण्यास आलेल्यांवरही हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांनी आरोपी बाबू हमीद शेख यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याची माहिती अशी की, फिर्यादी अमिना हमीद शेख (रा. मल्लिकार्जुननगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांच्यावर बाबू यांनी २० मार्च २०१६ रोजी राहत्या घरी येऊन चाकूने वार केले होते. 
 
तसेच हे भांडण सोडवण्यास आलेल्या बहीण मदिना वहिनी हिना यांनाही धाेपटण्याने मारले होते. एमआयडीसी पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी सरकारतर्फे अॅड. विशाखा भरते, तर फिर्यादीकडून अॅड. माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले. 
 
पत्नीच्या खुनाचा आरोप; पतीची निर्दोष मुक्तता 
पत्नीचा खून करून पोलिस ठाण्यामध्ये जाऊन घटनेची हकिकत सांगितल्याने प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश विभा कंकणवाडी यांनी आरोपी श्रीनाथ प्रकाश हाळदे (वय २९, रा. शेळगी, हिप्परगा रोड, सोलापूर) यांची निर्दोष मुक्तता केली आहे. २२ जुलै २०१५ रोजी आरोपी श्रीनाथ यांनी स्वाती या मनोरुग्ण आहे असे म्हणत त्यांना लाकडी दांडक्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. नंतर गळा दोरीने आवळून त्यांना जिवे ठार मारले होते. घटना घडल्यावर परत त्यांनी स्वत: पोलिसात जाऊन ही घटना सांगितली होती. याप्रकरणी आरोपीतर्फे अॅड. श्रीकांत गडदे यांनी तर सरकारतर्फे अॅड. इनायत अली शेख यांनी काम पाहिले. 
 
औद्योगिक वसाहतीत पावणेदोन लाखांची घरफोडी 
औद्योगिक वसाहतीत राहणारे महिबूब बाबूसाब सातखेड (वय ७०, रा. ब्लॉक नंबर १४, गुरुनाथनगर, कुमठा नाका) यांच्या घरात प्रवेश करून जवळपास १ लाख ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने रोख रक्कम चाेरून नेली आहे. हा प्रकार ४ मेच्या मध्यरात्री साडेबारा ते पहाटे चार या वेळेत घडला. 
 
सातखेड हे झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील लोखंडी गेटमधून प्रवेश करून बेडरुममधील लोखंडी कपाटातून सोन्याची गळसर, लॉकेट, पेंडल, अंगठी आदी ऐवज रोख चार हजार रुपये चोरून नेले आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक खरात करीत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...