आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीकडे दूरदृष्टी ठेवून वाटचाल हवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झाला आहे. ही सोलापूरकरांसाठी आनंदाची बाब आहे. आता दूरदृष्टी ठेवून वाटचाल करावी लागेल. राज्याच्या गुणवत्ता यादीत बाजी मारली, केंद्राच्या यादीतही शहराचा समावेश असेल. पाच वर्षांनंतर लोक मला विचारतील तुम्ही काय केले. तर, यावर माझे उत्तर असेल मी सोलापूरला स्मार्ट केले, असा विश्वास खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी व्यक्त केला.
राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात खासदार बनसोडे बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील उपस्थित होते. स्मार्ट सिटीसाठी आयुक्तांनी उत्तम सादरीकरण केले. त्यामुळे शहराची गुणवत्तेवर निवड झाली. कोल्हापूर शहरासाठी मोठी लाॅबिंग झाली होती. पण त्यापुढे समिती झुकली नाही, अशी माहितीही बनसोडे यांनी दिली.
शहरातील अतिक्रमण हटवावे
पाणीपुरवठ्याकडे लक्ष द्यावे
रस्त्याखालील ड्रेनेज पाइपलाइन वेगळी करा
जलस्त्रोत व्यवस्थित व्हावेत
सार्वजनिक स्वच्छता हवी
घनकचरा व्यवस्थापन पाहिजे
पुणे रोडवरील थीम पार्क
शिंदे यांचे मोठे योगदान
सोलापूरसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अनेक गोष्टी केल्या. त्याची यादी मोठी आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत पाच वर्षांत काय केले असे लोक म्हणायचे. त्याप्रमाणे लोक मला पाच वर्षांचा हिशेब मागतील. तेव्हा स्मार्ट सिटीचे हे उत्तर असेल, असेही ते म्हणाले.
केंद्राची परीक्षा उत्तीर्ण होऊ
१०० स्मार्ट सिटीत सोलापूरची निवड झाली असून, प्रथम टप्प्यात नाव येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे मनपा आयुक्त काळम-पाटील म्हणाले. राज्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो, केंद्रातही उत्तीर्ण होऊ. त्यासाठी स्मार्ट सिटी प्रोजेक्ट मनपाकडून तयार करण्यात येत आहे. मनपा गुणवत्तेवर कमी पडणार नाही, असे काळम-पाटील म्हणाले.
किल्ला परिसर बांधकामाचा प्रश्न सोडविणार
किल्ला परिसरात बांधकाम परवानगी मिळत नाही. तो प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले.