आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्पदंश झालेल्या ३४५ जणांना मिळाले जीवदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- जिल्ह्यातजानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत सर्पदंश झालेल्या ३५० जणांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ३४५ जणांचे प्राण वाचवण्यात रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले तर, पाच जणांचा मृत्यू झाला. सर्पदंश झालेल्या रुग्णांवर प्रामुख्याने एएसव्ही इंजेक्शनद्वारे उपचार करण्यात आल्याने सर्पदंश झालेल्यांचे प्राण वाचू शकले. दरम्यान, अशा रुग्णांच्या दृष्टीने रुग्णालयात या औषधीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
साप म्हणजे विषारी, जीवघेणा प्राणी असा सर्वसाधारण समज आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागात असून, त्यामध्ये बहुतांश लोक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणारे आहेत. शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जावे लागते. अशा वेळी साप चावल्याच्या अनेक घटना घडतात. मात्र, प्रत्येक साप विषारी असतो असे नाही. महाराष्ट्रात सापांच्या ५२ प्रजाती आहेत. त्यामध्ये केवळ १२ प्रजाती विषारी आहेत, तर ४० जाती बिनविषारी आहेत. तसेच नागरी वस्तीकडे आपले भक्ष्य शोधण्यासाठी येणाऱ्या सापांच्या जाती या चार असून, त्यामध्ये घोणस, फुरसे, नाग आणि मण्यार यांचा समावेश आहे. त्यामुळे कोणताही साप चावल्याने मृत्यू होतो असे गृहीत धरणे चुकीचे असल्याचे सर्पविषयक तज्ज्ञ आणि सर्पमित्रांकडून सांगितले जाते.
जिल्ह्यात मागील वर्षी ११ महिन्यांच्या कालावधीत ६१९ जणांना सर्पदंश झाला होता. या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत सर्पदंश झालेल्या ३५० जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ३४५ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले.
जिल्ह्यात आढळणाऱ्या सापांच्या प्रजाती

-विषारी- कोब्रा,मण्यार, फुरसे, घोणस
-बिनविषारी-पानदिवड,अजगर, गवत्या,
-निमविषारी-शेलाठी,धूळ नागीन आदी.

प्रत्येक साप हा विषारी नसतो
ग्रामीण भागात जुलै ते डिसेंबर महिन्याच्या कालावधीत साप चावण्याचे प्रमाण अधिक असते. शेतकऱ्यांना साप चावल्यास ते घाबरून जातात. मात्र, प्रत्येकच साप हा विषारी नसतो. आपल्याकडे कोब्रा, मण्यार, फुरसे, घोणस हेच साप विषारी असून, ते क्वचितच आढळून येतात. -राजू सोनुने, सर्पमित्र,चिखली

अशी घ्यावी काळजी
घराच्यापरिसरात साप दिसल्यास सर्पमित्रांना कळवले पाहिजे. प्रत्येक साप विषारी नसतो. त्यामुळे सापांना मारणे टाळावे. शेतातील साप शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे. सर्पदंश झाल्यावर त्वरित रुग्णालयात जावे. तंत्र, मंत्र किंवा मांत्रिकाडून विष उतवण्याचे प्रकार करू नये. साप चावल्यास धावत जाऊन रुग्णालय गाठू नये, यामुळे विष जोमाने चढते.

केले जातात उपचार
यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत ३५० जणांना सर्पदंश झाला. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्पदंश रुग्णांवर आवश्यक उपचार केले जातात.

अंधश्रद्धा बाळगणे अयोग्य
सापचावला म्हणजे मृत्यू होत नाही. प्रत्येकच साप हा विषारी नसतो म्हणून रुग्णांनी साप चावला म्हणजे तांत्रिक-मांत्रिकाकडे जाता २४ तासाच्या आत रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात एएसव्हीचे इंजेक्शन उपलब्ध असून, यासह योग्य उपचारांमुळे सर्पदंशाचा रुग्ण त्वरित बरा होतो. -संगीता वाघ, अधिपरिचारीका,बुलडाणा.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सर्पदंश झालेल्यांची संख्या