आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळाचे रुपडे पालटणार, तीन कोटी रुपयांची कामे होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर विमानतळाचे नूतनीकरण होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सुमारे तीन कोटी रुपये नुकतेच मंजूर केले. 
 
मुख्य इमारत राष्ट्रीय विमानतळाप्रमाणे होणार आहे. विस्तारीकरणासोबत अन्य बाबतीत सुधारणा केली जाणार आहे. उड्डाण योजनेंतर्गत सोलापूर विमानतळावरून सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होत आहे. विमानसेवा पुरविणाऱ्या कंपन्याची गरज, प्रवासी सुविधा आदी बाबींचा विचार करून सोलापूर विमानतळाचे नूतनीकरण केले जाणार आहे. विमानतळ प्रशासनाने याचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या मुंबई कार्यालयाला पाठवला होता. प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागाकडून येत्या आठवड्यातच विमानतळावर काम सुरू होणार आहे. 
सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळाच्या मुख्य इमारतीसह अन्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहे. गुरुवारी याचे काम सुरू आहे. पुणे अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १६ कॅमेरे बसविले जात आहे. 

ही होतील कामे 
मुख्य इमारतीच्या विस्तारीकरणाबरोबरच आगमन निर्गमन कक्षाचे विस्तारीकरण, प्रवाशांसाठी मोठे अत्याधुनिक असे वेटिंग हॉल, स्वच्छतागृह, पार्किंग, ट्रॉली, रिफलिंग सेंटर आदी विविध कामे मार्गी लागणार आहे. दोन महिन्यात ही कामे होतील. 

परवान्यासाठी प्रस्ताव पाठवणार 
विमानसेवा सुरू करण्यापूर्वी डीजीसीएची परवानगी घेणे आवश्यक असते. परवानाही घेणे अत्यंत गरजेचे असेल. ते नसेल तर विमान वाहतूक ही बेकायदेशीर मानली जाते. त्यामुळे सोलापूर विमानतळ प्रशासन हा परवाना मिळविण्यासाठी ‘डीजीसीए’कडे प्रस्ताव पाठवत आहे. एक महिन्याच्या अातच सोलापूर विमानतळाला परवाना मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
सोलापूर विमानतळावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कामास सुरुवात झाली. 

सर्व सुविधा पुरवणार 
^सोलापूर विमानतळाच्या मुख्य इमारतीत महत्त्वपूर्ण बदल केला जाईल. येत्या काळात विमानतळाचा चेहरा मोहरा बदलून जाणार आहे. प्रवाशांसाठी आवश्यक अशा सर्व सुविधा पुरविण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.” संतोष कौलगी, व्यवस्थापक, सोलापूर विमानतळ 
बातम्या आणखी आहेत...