Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | news about Solapur Bhuikot

सासवडच्या जाधवगड धर्तीवर करता येईल सोलापूर भुईकोट

रामेश्वर विभूते | Update - Oct 12, 2017, 10:47 AM IST

राज्यातील गड, कोट, किल्ले हे जरी केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असले तरी राज्यातील २०० निवडक किल्ल्यांमध्य

 • news about Solapur Bhuikot
  सोलापूर- राज्यातील गड, कोट, किल्ले हे जरी केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असले तरी राज्यातील २०० निवडक किल्ल्यांमध्ये निवास व्यवस्था उभी करण्याचे सूतोवाच राज्याच्या पर्यटन मंत्र्यांनी केले आहे. यास प्रतिसाद म्हणून सासवडच्या जाधववाडीचे संस्थानिक बाबाराजे जाधवराव यांनी त्यांनी विकसित केलेल्या जाधवगडप्रमाणे किल्ल्यांमध्ये विविध सोयी सुविधा देत सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांना एक आदर्श पर्यटनस्थळ बनविता येईल, अशी अाशा ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केली आहे.

  पुण्याच्या सासवडपासून अवघ्या काही अंतरावर जाधववाडी नामक एक छोटेसे गाव आहे. येथेच जाधवराव या संस्थानिकांचे इतिहासकालीन टोलेजंग घर आहे. यास त्यांनी पर्यटनस्थळाप्रमाणे विकसित करून एक हॉलिडे रिसॉर्ट केले आहे.

  या वाड्यात जलतरण तलावापासून, राहण्याची अलिशान दालने, फिरस्तीसाठी गवताचे वाफे, बागा, कापडी टेंट आदींसह अनेक सुविधा त्यांनी निर्माण केल्या आहेत. या वाड्याला बाहेरून पाहिले तर तो एक किल्लाच वाटतो. परंतु या वाड्यात निवास व्यवस्थेसह भोजन, नाश्ता एखाद्या पर्यटनस्थळ प्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे.

  संपूर्ण कुटुंबाला एक दिवसीय पिकनिक किंवा दोन -तीन दिवस राहण्याच्या पॅकेजेस येथे ठेवण्यात आले आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा म्हणून या जाधवगडचा पर्याय अनेकजण निवडतात. त्यांनी याचे इंटरनेटद्वारे मार्केटिंग केल्याने राज्यातील आणि भारतातीलच नाही तर परदेशातील नागरिकही येथे वास्तव्यास येतात.

  इथेही आहे उपयुक्तता
  सोलापूरच्या भुईकोटचा परिसर ही विस्तीर्ण असून याचा वापरही विविध प्रकारे करता येईल. परिसरात वाढलेली झाडी काढून तेथे छोटे तंबू बांधत एक दिवसीय निवासाची सोय करता येते. आहे त्या उपलब्ध बगिच्याचा वापर फिरस्तीसाठी आणि अन्य सोयी देत व्यवसायाच्या दृष्टीने विचार करता येऊ शकतो.

  संस्कृती टिकावी वाढावी
  राज्यातील किल्ल्यांचा पर्यटनासाठी वापर तसा करता येणार नाही, कारण या वास्तू पुरातन असून पुरातत्त्व खात्याच्या अधीन आहेत. जाधवगड हे आमचे घर होते. ते आमच्या खासगी मालकीचे आहे. जाधव कुटुंबातील आमची १३ वी पिढी आहे. आपला इतिहास, संस्कृती आणि वारसा काय आहे, हे समजण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे. बरेच पर्यटक याकडे आकर्षित होतात. संस्कृती टिकावी तसेच ती वृद्घिंगत व्हावी, असे मला वाटते.
  - बाबाराजे जाधवराव, संस्थानिक तथा जाधवगड रिसॉर्टचे मालक

Trending