आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षात 3 हजार 896 कोटींचे अंदाजपत्रक, शहराच्या समस्या त्याच, मात्र सुटता सुटेनात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या पाच वर्षांत महापालिकेचे अंदाजपत्रक तब्बल तीन हजार ८९७ कोटींचे होते. शहराच्या पायाभूत समस्याही त्याच आहेत. यापैकी एकाही समस्येपासून सोलापूरकरांची सुटका झालेली नाही. रोज पुरेशा दाबाने पाणीपुरवठा, नियमित कचरा सफाई, चांगले रस्ते, धूळ आणि प्रदूषण मुक्त हवा अशा प्राथमिक आणि महत्त्वाच्या गोष्टींपासून नागरिक वंचितच आहेत. मागे वळून पाहिले असता आजचा दिवस पुढे ढकलण्याखेरीज नगरसेवक आणि प्रशासनाने काहीही नवे केल्याचे दिसून आले नाही.

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष भरघोस आश्वासने देतात. राणा भीमदेवीच्या थाटात जाहीरनामे आणि वचननामे जारी करतात. मात्र, एकही पक्ष त्यावर खरा उतरत नाही. किमान जबाबदारीचे भान बाळगून तसा प्रयत्न करत असल्याचेही दिसून येत नाही. जमीन नसलेली ही आश्वासने सत्यात येत नाहीत. त्यांना काही अर्थ असल्याचे कारभारातून दिसत नाही.

काँग्रेस पक्षाने रोज पाणीपुरवठा, स्वच्छ सोलापूर, मेट्रो, रस्ते आदी आश्वासने जाहीरनाम्यात दिली होती. माजी महापौर अलका राठोड, विद्यमान महापौर सुशीला आबुटे यांच्या कार्यकाळात त्यांची पूर्तता झाली नाही. भांडवली शासकीय अनुदान मिळून एकूण तीन हजार ८९७ कोटींचे अंदाजपत्रक पाच वर्षात सादर झाले. त्यातील दरवर्षी पाच ते सहा सूचना शिफारसी सुटणाऱ्या आहेत. अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीविषयी स्थायी समितीने त्रैमासिक आढावा घेतला नाही.

धुळीची समस्या सुटली नाही
शहातील धुळीच्या समस्येची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली. खड्डेमुक्त मोठे रस्ते करण्याचे त्यातून ठरले. एमएसआरडीसीकडून रस्ते बांधून घेण्यात आले. दूरदृष्टी आणि नियोजनाचा अभाव असल्याने दोन-तीन वर्षात जलवाहिनी आदी कारणांसाठी नवे रस्ते खोदण्यात आले. वेळेत त्याची चांगली दुरुस्ती केली गेली नाही. अन्य रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे आहेत. त्यांची दुरुस्ती नावालाच होते. रस्त्यावर जिकडे-तिकडे धूळ कायम पसरलेली. वाहनांच्या चाकांमुळे ती हवेत उडत राहाते. सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊनही त्याचे गांभीर्य नगरसेवकांना नाही, की राजकीय पक्षांच्या कळत्या वरिष्ठ नेत्यांनाही नाही.

महिनाभरबैठका, काय उपयोग?
२० फेब्रुवारीच्या आत आयुक्त स्थायी समितीकडे अदाजपत्रक सादर केल्यानंतर मार्चाच्या पहिल्या आठवड्यात सभापती नियुक्त होईपर्यंत विषय तहकूब ठेवला जातो. तिसऱ्या आठवड्यात चर्चेसाठी येतो. मंजुरीअंती सभागृहाकडे जातो. तेथे ३० ३१ मार्च दोन दिवस सभा होते. महिनाभर बैठका चालतात. उपयोग मात्र, होत नाही.

प्रशासन काम करत नाही
^अंदाजपत्रकात तरतूद असते. त्याची अंमलबजावणी प्रशासन करत नाही. पाण्याचे नियोजन चुकत आहे. पाण्यासाठी मागेल तितका निधी दिला. पण काम झाले नाही. यंत्रणा बदलणे आवश्यक आहे. प्रशासनाचा वाईट अनुभव आहे.” अलका राठोड, माजी महापौर

प्रशासन दोषी
^काही नगरसेवक दादागिरी करून आपल्या भागात पाणी पळवतात. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. सभागृह नेता असताना तरतुदी करून दिल्या, पण अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासनाचे आहे. होत नसेल तर पुन्हा सभागृहाकडे पाठवणे आवश्यक आहे. यात आयुक्तांनी लक्ष घातले पाहिजे.” महेशकोठे, माजी सभागृह नेता

आमच्यासमस्या कायम
^महापालिकेने साडेतीन हजार कोटी खर्च केले असले तरी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या कायम राहिल्या अाहेत. पाणी, दिवाबत्ती, रस्ते, आरोग्य, कचरा यासारखे प्रश्न आजही कायम अाहे. काेणत्याही राजकीय पक्षाने नागरिकांसाठी काय केले ते सांगावे.” आनंद तालीकोटी, नागरिक

होतनसेल तर राजीनामा द्या
^महापालिकेचा पाच वर्षांचा कारभार म्हणजे करमणूक आहे. अंदाजपत्रक केले जाते. अंमलबजावणी काहीच नाही. सभागृहात आवाज उठवला. ते नागरिकांची दिशाभूल करतात.” सुरेशपाटील, माजी विरोधी पक्षनेता

प्रशासनकाम करत नाही
^जीआयएससर्व्हेनुसार मिळकतीचा शोध घेतला जात नाही. याबाबत आम्ही सभागृहात वारंवार विचारले. पाण्यासाठी पक्षाचे उपमहापौर वारंवार बोलतात. प्रशासन काम करत नाही.”
पद्माकरकाळे, गटनेता राष्ट्रवादी

सर्व नगरसेवक, सत्ताधाऱ्यांचे बोट प्रशासनाकडे, नियंत्रण ठेवण्यात लोकप्रतिनिधींना अपयश
अंदाजपत्रकात सूचना शिफारसी केल्या जातात. त्याची अंमलबजावणी होते की नाही? याबाबत पदाधिकारी, नगरसेवकांना विचारले असता, त्यांनी प्रशासनाकडे बोट दाखवले. लोकप्रतिनिधींचे प्रशासन ऐकत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवले गेले नाही. तसा एकही प्रस्ताव आलेला नाही. गाळ्यांची भाडेवाढ करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांची बदली केली जाते. चोख काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मात्र, बदली करण्याच्या कवायतीत ताकद खर्ची घालण्यात येते.
रोज पाणी देण्यास पालकमंत्र्यांचा विरोध
^राेजपाणी पुरवठा केला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मात्र, पालकमंत्री रोज पाणीपुरवठा नको म्हणतात. मनपाचे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत जकात होते. त्याला पर्याय म्हणून ‘एलबीटी’ दिले होते. तेही काढून घेतले आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या तिजोरीवर पडला आहे. उत्पनाचे स्रोत कमी आणि विकासकामे वाढत अाहेत, असे विरोधाभासी चित्र आहे. राज्यात आमचे सरकार असताना ‘यूआयडीएसएसएमटी’तून ७१ कोटी आणले. त्यामुळे हद्दवाढ भागात पाणीपुरवठा सुरू आहे.” संजय हेमगड्डी, सभागृह नेता

पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा
^सभेत सूचना शिफारसी सत्ताधारी मांडतात. पण पुढे काय झाले हे पाहणे त्यांचे काम आहे. ते करत नाहीत. आमच्या सूचना शिफारसी ते मानत नाहीत. मांडायचे म्हणून मांडतात. पण काही हाेत नाही. त्यांचा फटका नागरिकांना बसतो.” भीमाशंकर म्हेत्रे, गटनेता शिवसेना

प्रशासनाच्या नियोजनात त्रुटी
^रोज पाणीपुरवठा झाला पाहिजे. यासाठी सत्ताधारी म्हणून तरतूद केली. पाण्यासाठी पूर्ण तरतूद केली. तरीही प्रशासनाच्या नियोजनात त्रुटी आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. पाण्यासाठी आम्ही पूर्वीपासून आग्रही होतो. आग्रह धरल्याने दोन दिवसांआड पाणीपुरवठा झाला.” सुशीलाआबुटे, महापौर

सभागृहातील आश्वासन पाळले जात नाही
^बसपमाकपच्या वतीने आम्ही भूमिका मांडत असतो. सर्वसामान्य लोकांना केंद्रात ठेवून अंदाजपत्रक मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. सभागृहात सूचना शिफारसी मांडल्या जातात. त्याचे पुढे काय होते हे पाहिले जात नाही. नागरी हित सत्ताधारी पाहत नाहीत.” आनंद चंदनशिवे, गटनेता बसपा माकपा

विरोधी पक्ष उरला नावापुरता
सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची असते. भारतीय जनता पक्षाचे दोन विरोधी पक्ष नेते झाले. त्यांना सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवता आले नाही. त्यांच्या अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाचा फटका नागरिकांना बसला. अन्य पक्षांची ताकद पुरेशी ठरली नाही.

याला लागला ब्रेक
{पदाधिकारी निधी
{संभाजी तलाव येथे वाॅटर पार्क गप्पी मासे पैदास केंद्र
{रस्ते खोदकाम केल्यास जबाबदारी निश्चित करणे
{मनपा जागेवरील अतिक्रमण काढणे
{नोटरी खरेदीवर नाव लावणे
{तीन महिन्यातून एकदा आर्थिक आढावा बैठक घेणे
Áनगरोत्थान योजनेतून ड्रेनेज लाइन रस्ते
Áशहरातील बागांचा विकास
Áमहापौर चषक खेळाडूसाठी वसतिगृह
Áआरोग्य अधिकारी पद भरणे
Áवृद्धांसाठी विरंगुळा केंद्र
Áबेकायदा नळ शोध मोहीम
Áकचरा उचलणे
Áबीओटी कामे अर्धवट नवीन काम सुरू नाही
Áगाळे भाडेवाढ विषय
हे नाही
Àकरवसुली प्रभावीपणे करणे
Àकर्मचाऱ्यांची वर्कलोड तपासणी
Àखर्चाची माहिती अंदाजपत्रकात देणे
Àवृद्ध कलाकारांना मानधन देणे
Àएलईडी पथदिवे लावणे
Àनो पार्किंग झोन करणे
हे झाले
Àविद्यार्थ्यांनामोफत बस पास
Àआधुनिक मासळी बाजार
Àखुल्या प्लाॅटला पाच ऐवजी दोन टक्के आकारणी
Àवसंतराव नाईक यांचा पुतळा
Àनंदीध्वज मार्गावर अंडरग्राऊंड केबल
पाच आश्वासने कागदावरच
Áरोज सुरळीत पाणीपुरवठा
Áमोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
Áमहापालिका आरोग्य यंत्रणा सुधारा
Áयुज नाही तर युजर चार्ज नको

Áबेकायदा बांधकामे शोध कर आकारणी
पाणी मुबलक असतानाही पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. रस्ते होतात, पण लगेच खड्डेही पडतात. त्यामुळे धुळीची समस्या भीषण झाल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.
नियमित स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, नियमित कचरा सफाई, धूळ प्रदूषण मुक्त हवा या प्राथमिक गोष्टी मिळणे दुरापास्त
बातम्या आणखी आहेत...