आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर- सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सासरच्या लोकांकडून होत असलेल्या मानसिक शारीरिक त्रासास कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याच्या घटनेची नोंद विजापूर रोड पोलिस ठाण्यात झाली आहे. यात हकिकत अशी की, अंजली रमेश माशाळकर (रा. विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक २) यांना १ मे २०१६ रोजी लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांपासून २ मे २०१७ पर्यंत सासरच्यांकडून पैशासाठी त्रास होत होता. पती रमेश हे माहेरहून टेम्पो घेऊन ये, तुला स्वयंपाक करता येत नाही, उशिराच उठते म्हणून वारंवार मारहाण होत शारीरिक मानसिक त्रास द्यायचे. या त्रासास कंटाळून अंजली यांनी २ मे २०१७ रोजी सासरी राहत्या घरी लाकडी वाशाला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी चंद्रकांत चिमिजी मेटकरी (वय ४७, रा. गरिबी हटाव झाेपडपट्टी) यांनी पती रमेश, काशीबाई अशोक माशाळकर, अशोक माशाळकर यांच्याविरुद्ध अंजली यांचा जाचहाट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण करीत आहेत. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, पाचतोळे पाटल्या, एक लाखासाठी विवाहितेचा छळ...
बातम्या आणखी आहेत...