आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुळे सोलापुरातील आरक्षण वाचवण्यासाठी कृती समिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जुळेसोलापूर विकास आराखडा मंजूर करण्यासाठी शासनाकडे निर्णय प्रलंबित असताना, तेथील आरक्षण वाचवण्यासाठी त्या परिसरातील २१ सोसायट्या एकत्र येऊन अारक्षित जागा बचाव कृती समिती स्थापन केली आहे. भाजप सरकारकडे निर्णय असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे काम करणार आहे. जुळे सोलापुरातील जानकीनगर बाग वाचवण्यात यश आले असताना विकास आराखड्यासाठी जनरेटा पुढे येणार आहे.

जुळे सोलापूर भाग मध्ये २९३ हेक्टर इतकी जागा असून, त्यापैकी ९१.६३ हेक्टर जागेवर विविध उद्देशांसाठी आरक्षण सहाय्यक नगर रचना कार्यालयाने टाकले. त्यावर सूचना हरकती मागवण्यात आल्या. त्यानंतर ४८.८२ हेक्टर जागेवरील आरक्षण वगळले. ४२.८२ हेक्टर जागेवर आरक्षण कायम आहे. त्यात शासनाकडून बदल होऊ नये आणि आरक्षण वाढावे यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. समितीच्या अध्यक्षपदी परिसरातील नगरसेवक महापालिकेतील विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांच्यासह सुभाष कालदीप, माधव गोडसे यांचा समावेश आहे.

असे आरक्षण
४२.८२ हेक्टर जागेपैकी रेल्वेच्या ११ हेक्टर जागेवर १४ आरक्षण आहे. ते आरक्षण रद्द होईल. त्यानंतर ३१ हेक्टर जागा राहील. मुळात ९१ हेक्टर आरक्षण असताना ३१ हेक्टरवर आल्यास नागरिकांच्या सुविधेवर परिणाम होईल.

सहा हेक्टर जागेवर आरक्षण
जुळे सोलापुरात सहा हेक्टर जागेवरील आरक्षण कायम ठेवणे आवश्यक असून, तेथे सांस्कृतिक भवन, प्ले ग्राऊंड, बस टर्मिनस, सरकारी दवाखाना, भाजी मंडई, माध्यमिक शाळा, अग्निशमन दल आदी नागरी सोयी असणे आवश्यक आहे. ते विकास आराखड्यातून वगळल्यास २६ हेक्टर जागेवर आरक्षण असतील. त्यामुळे जुळे सोलापुरात आरक्षित जागा कमी होतील. नागरिकांच्या सार्वजनिक जीवनावर परिणाम करणारी ठरेल. तेथील आरक्षण उठवण्यासाठी राजकीय नेते प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले
जुळे सोलापुरातीलआरक्षित जागा कायम राहावी यासाठी बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली. नियोजन समितीने केलेली शिफारस विकासाला बाधक ठरणारी आहे. तो अहवाल दप्तरी दाखल करून म्हाडाच्या मुळे विकास योजनेतील आरक्षण कायम ठेवून आराखड्यास मान्यता द्यावी, असे निवेदन मुख्यमंत्र्यांना भेटून दिले.” नरेंद्र काळे, अध्यक्ष,आरक्षण बचाव कृती समिती