आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रवादीकाँग्रेस काँग्रेस यांनी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी आघाडी केली आहे. दोन्ही काँग्रेसच्या समन्वयातून पदाधिकारी निवड होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखेे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. 
ब्रह्मदेवदादा माने बँकेत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. श्री. साळुंखे म्हणाले, “आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. पण, सत्तेचा गड राखण्यात यशस्वी झालो. राष्ट्रवादीचे २६ सदस्य अाहेत. सांगोला तालुक्यात शेकापसमवेत आमची आघाडी आहे. काँग्रेसच्या आठ सदस्यांना सोबत घेऊन आम्ही सत्तेचा ‘सोपान’ सहज पार करणार.” 

श्री. पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला. सत्तेतील पद वाटपासंदर्भात दोन्ही काँग्रेसची वरिष्ठ नेतेमंडळी घेतील त्या आदेशान्वये आम्ही काम करू. आघाडीसंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हाला बोलावले असून, ही पहिली बैठक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला आमदार दिलीप सोपल, आमदार भारत भालके, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने उपस्थित होते. 

काठावरील बहुमताच्या जोरावर मावळत्या पंचवार्षिक कार्यकाळात काँग्रेसला सत्तेत वाटा देणाऱ्या ‘राष्ट्रवादी’ने निवडणुकीपूर्वी आघाडी केली नाही. पण, भाजप महायुतीचे नेतेमंडळी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या ‘राष्ट्रवादी’ने काँग्रेसकडे मदतीसाठी ‘हात’ मागितल्याचे दिसते. उत्तरबाबत स्वतंत्र बैठक : उत्तरसोलापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने वरिष्ठ नेत्यांना कळवून भाजपसोबत आघाडी केली. पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता काँग्रेस सोबत राहणार का? या प्रश्नावर बोलताना उत्तरबाबत स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करू, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी स्पष्ट केले. 

पंचायत समितीनंतर ठरणार झेडपीचे गणित :जिल्ह्यातील ११ पंचायत समिती सभापती पदाच्या निवडी १४ मार्च पूर्वी होणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड २१ मार्चदरम्यान होईल. पंचायत समिती सभापती निवडीनंतर झेडपी अध्यक्षपदाच्या हालचालीस वेग होईल. तालुकापातळीवर सभापती निवडीदरम्यान काही ठिकाणी सदस्य संख्या बरोबरीची असल्याने सदस्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना महायुतीच्या काही सदस्यांना आपलेसे करण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांनी सुरू केलेत. पंचायत समिती सभापतिपदाच्या सत्तासमीकरणाचा प्रभाव निश्चितच जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवर होणार आहे. 

उत्तरबाबत स्वतंत्र बैठक 
उत्तर सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने वरिष्ठ नेत्यांना कळवून भाजपसोबत आघाडी केली. पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता काँग्रेस सोबत राहणार का? या प्रश्नावर बोलताना उत्तरबाबत स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करू, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी स्पष्ट केले. 
 
पंचायत समितीनंतर ठरणार झेडपीचे गणित 
जिल्ह्यातील ११ पंचायत समिती सभापती पदाच्या निवडी १४ मार्च पूर्वी होणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड २१ मार्चदरम्यान होईल. पंचायत समिती सभापती निवडीनंतर झेडपी अध्यक्षपदाच्या हालचालीस वेग होईल. तालुकापातळीवर सभापती निवडीदरम्यान काही ठिकाणी सदस्य संख्या बरोबरीची असल्याने सदस्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना महायुतीच्या काही सदस्यांना आपलेसे करण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांनी सुरू केलेत. पंचायत समिती सभापतिपदाच्या सत्तासमीकरणाचा प्रभाव निश्चितच जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवर होणार आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...