आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार, शिंदेनी सांगूनही अाघाडीचा सुवर्णमध्य हुकला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बदलत्या राजकीय परिस्थितीत महापालिका निवडणुकीसाठी अाघाडी कराच, असा स्पष्ट अादेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अाणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी देऊनही स्थानिक नेत्यांना अाघाडीचा सुवर्णमध्य साधता अाला नाही. अाघाडी होणार नसल्याची घोषणा बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली. 
 
शहर मध्यमधील जागा सोडण्यास काँग्रेसने नकार दिल्याने अाघाडी तुटल्याचा अारोप राष्ट्रवादीने केला तर राज्यभरातच राष्ट्रवादी भाजपला मदत करण्याचे धोरण ठरवत असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले अाहे. या घडामोडींमुळे अाता मुंबई, पुणे पाठोपाठ सोलापुरातही चारही प्रमुख पक्ष याही वेळी स्वबळावर लढणार अाहेत.
 
निवडणूक जाहीर होण्याच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बारामतीला जाऊन अाले. अाघाडी होण्याची शक्यता बळावली होती. शहरात दोन्ही संबपक्षाचेनेते गेल्या २१ जानेवारी पासून जागा वाटपाच्या चर्चेचे गु-हाळ चालवित होते. इतक्या दिवसाच्या चर्चेनंतरही अखेर जागा वाटपाचा तिढा सुटला नाही.
 
प्रस्ताव, फाॅर्म्युला अाणि बिघाडी 
काँग्रेस अाणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपासाठी २१ जानेवारीपासून बैठका सुरू होत्या. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या कार्यालयात आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या सिटी पार्क या हाॅटेलमध्ये या बैठकांचे सत्र सुरू होते. सुरूवातीला दोन्ही पक्षात अाघाडी करण्यावर एकमत झाले, त्यानंतर ३० जागा राष्ट्रवादी ७२ जागा काँग्रेस असा फाॅर्म्युला समोर अाला.
 
 नंतर पाच वार्डात मैत्रीपूर्ण लढतीचा फाॅर्म्युला अाला. त्यानंतर २२ जागा राष्ट्रवादीला सोडून अन्य जागांवर नंतर निर्णय घेण्याचे ठरले. त्यासाठी शरद पवार अाणि सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे प्रस्ताव धाडण्यात अाले. अाणि बुधवारी रात्री साडेदहा वाजता अाघाडी तुटल्याची घोषणा झाली. 
 
पहिलाच प्रयत्न तोही फसला 
काँग्रेस अाणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष महापालिकेत सत्तेत एकत्र असलेतरी अात्तापर्यंत ते कधीही एकत्र येऊन निवडणूक लढवू शकले नाहीत. पहिल्यांदाच या दोन पक्षात अाघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण जागा वाटपात जमले नाही, अन् हे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात एकत्र येण्याचा प्रयत्न फसला. 
 
काँग्रेससमोर आव्हान, भाजपला मतविभागणीचा धोका 
भाजप अाणि शिवसेनेची युती तुटल्याने काँग्रेस अाघाडी झाली तर भाजप विरोधातील मतविभागणी टाळता येईल अाणि निवडणूक सोपी जाईल असा कयास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला होता. पण त्याला अाता तडा गेला अाहे. सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेसलाही अाता मोठे अाव्हान घेऊन लढावे लागणार अाहे.
 
 एकूणच वातावरण भाजपला अनुकूल असल्याचे बोलले जाते. त्यातच भाजपकडे दोन मंत्री, एक खासदार अशी मोठी ताकद अाहे, त्याचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस अाणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठे परिश्रम घ्यावे लागणार अाहेत. महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, पुणे पाठोपाठ सोलापुरातही अाघाडी तुटली अाहे. शिवसेना वेगळी झाल्याने भाजपलाही मतविभागणीचा धोका अाहेच. एकूणच राजकीय वातावरण तापविणाऱ्या या घडामोडी अाहेत. 
 
उपमहापौर डोंगरे यांना जागा सोडण्यास काँग्रेसचा नकार 
प्रभाग क्रमांक नऊ, सात, सहा २२ प्रभागातील जागा वाटप अाघाडीत कळीचा मुद्दा ठरला होता. उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्यासाठी जागा सोडणे शक्य झाले नाही हाही मुद्दा अाघाडी तुटण्यास कारण ठरला. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव होता, पण तोही मान्य झाला नाही. वरिष्ठ नेत्यांनी सांगूनही स्थानिक नेत्यांनी अाघाडीसाठी जागा वाटपाचा तिढा सोडवू शकले नाहीत. त्यामुळे भाजप विरोधात मतविभागणी होऊ नये या प्रयत्नाला तडा गेला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...