आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाळ, मृदंगांच्या निनादात रंगला माघ वारीनिमित्त रिंगण सोहळा, पालखी सोहळा उत्साहात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - टाळ,मृदंगांच्या निनादात याची देही, याची डोळा पाहिला माघ वारीनिमित्त रिंगण सोहळा. पंढरीची वारी जयाचिये कुळी, त्याची पायधुळी लागो मज, या तीव्र तळमळीने वारकरी मंडळाकडून पालखी सोहळ्याचे नियोजन केले होते. परंपरेप्रमाणे वारीची लगबग माघ महिन्यामध्ये सुरू होते. 

पार्क चौक येथे अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे रिंगळ सोहळा आयोजिला होता. संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज पालखी अश्वाचे पूजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे त्यांची पत्नी अंजली डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. पूजनानंतर रिंगण सोहळ्यास ध्वजाधारी भाविकांकडून प्रारंभ केला. त्यानंतर तुळस जलकुंभधारी महिला, मृदंग टाळवाले चोपदारांचे रिंगण झाले. त्यानंतर अश्वारुढ नयनरम्य रिंगण पार पडले. 

यावेळी दत्ता सुरवसे, नामदेव महाराज देवकते, भागवत महाराज चवरे, नंदू महाराज कोंगारी, दिनकर देशमुख, बंडोपंत कुलकर्णी, संजय पवार, अंकुश चव्हाण, नगराध्यक्ष राजेश माळी, विक्रम खेलबुडे उपस्थित होते. मान्यवरांचा वारकरी मंडळातर्फे केशव लोंढे, ज्याेतीराम चांगभले, विठ्ठल दांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

शहरातील ४३ दिंड्या परिसरातील २५ दिंड्यांच्या उपस्थितीमध्ये वारकरी नित्यनेमाचे भजन बंडोपंत कुलकर्णी महाराज यांच्या मार्गदर्शनाने सुरू केले. सहभागी झालेल्या सर्व दिंड्या दुपारी साडेचार वाजता पार्क मैदानावर दाखल झाल्या. अश्वाचे मानकरी सौदागर जगताप यांनी रिंगण लावून घेतले.

 रिंगण साेहळा पाहण्यासाठी अबाल वृद्धापासून तरुणांनी गर्दी केली होती. सोहळा यशस्वी करण्यासाठी बळीराम जांभळे, विष्णू लिंबोळे, शिवाजी व्हनकडे, हरिहर मोरे, विश्वास गायकवाड, संजय पाटील, नामदेव पुकाळे, खंडेराव कडबाने, भगवान पाटील, विजय गाडे यांनी सहकार्य केले. सुधाकर इंगळे महाराज यांनी सूत्रसंचालन नियोजन केले. 
बातम्या आणखी आहेत...